Pune News : महाराष्ट्रसह संबंध भारतात रेल्वे प्रमाणेच सरकारी बसेसने प्रवास करणाऱ्यांची संख्या देखील फारच उल्लेखनीय आहे. दरम्यान राज्यातील एसटी प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे.
ही बातमी पुणे जिल्ह्यातील दौंड शहर व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांसाठी अधिक खास ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार दौंडकरांना आता नवीन बस स्थानकाची भेट मिळणार आहे.

शहरातील बस स्थानक आणि एसटी आगाराच्या नूतनीकरणासाठी मोठा भरीव निधी शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे. या कामासाठी शासनाकडून अखेर कार सात कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून यासाठी आमदार एडवोकेट राहुल कुल यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.
आमदार कुल यांच्या पाठपुराव्यामुळे आता राज्य शासनाच्या परिवहन व गृह विभागाने या प्रकल्पासाठी सात कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून या प्रस्तावाला नुकताच हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे.
दरम्यान हा प्रस्ताव मंजूर झाला असल्याने आता दौंड शहरातील बस स्थानक आणि एसटी आगाराचे नूतनीकरण शक्य होणार आहे. सध्या स्थितीला दौंड बस स्थानकाची अवस्था फारच दयनीय झाली आहे आणि यामुळे प्रवाशांस समवेत कर्मचाऱ्यांना सुद्धा मोठ्या अडचणींचा डोंगर पार करावा लागतोय.
दरम्यान कर्मचाऱ्यांची आणि प्रवाशांची होणारी अडचण पाहता आमदार राहुल कुल यांनी या बस स्थानकाच्या कामासाठी शासनाकडे जोरदार पाठपुरावा सुरू केला होता.
दरम्यान याच पाठपुराव्याच्या पार्श्वभूमीवर 31 डिसेंबर 2025 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण शासन निर्णय जाहीर करत बस स्थानकाच्या कायापालटाचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे.
बसस्थानकात कोणकोणती कामे केली जाणार?
आता या मंजूर झालेल्या निधीमधून बस स्थानक आणि आगाराचा पूर्णता कायापालट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या निधीमधून मुख्य आगाराची इमारत पूर्णपणे दुरुस्त केली जाणार आहे.
तसेच चालक व वाहकांसाठी टॉयलेट तयार केले जाणार आहे आणि एक नवं विश्रांतीगृह सुद्धा उभारले जाईल. याची विशेषता म्हणजे जे महिला कर्मचारी असतील त्यांच्यासाठी स्वातंत्र्य विश्रांतीगृह तयार होणार आहे. जे लाईन चेकिंग पथक असतं त्यासाठी वेगळी खोली सुद्धा बांधली जाणार आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे दोन कोटी 77 लाख रुपयांपेक्षा अधिकचा खर्च करून आगार आणि बस स्थानक परिसरात काँक्रिटीकरण सुद्धा होणार अशी माहिती देण्यात आली आहे. याशिवाय विविध विभागांसाठी नवीन इमारती बांधल्या जाणार आहेत.
याव्यतिरिक्त रेन वॉटर हार्वेस्टिंग, आधुनिक अग्निशमन प्रणाली, संरक्षण भिंत तसेच नवीन प्रवेशद्वार सुद्धा प्रस्तावित आहे. नक्कीच या प्रकल्पासाठी शासनाकडून भरीव निधी मंजूर झाला असल्याने लवकरच हे काम पूर्ण होईल आणि दौंडकरांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा राहणार आहे.