अहिल्यानगर: एकेकाळी दुष्काळी म्हणुन ओळखला जाणारा पाथर्डी तालुका हा सध्या दुधा तुपाचा व फळबागांचा तालुका म्हणुन नावारुपाला येतोय. एकलाख लिटर रोज दुध येथे जमा होते. तर तेरा हजार चाळीस एकर फळबाग तालुक्यात आहे. दुध व फळबागामुळे तालुक्याचे अर्थकारण सक्षम झाले आहे. शासनाकडुन विविध प्रकारचे जलसंधारणाचे झालेले काम, मुळाचारीचे पाणी, बंधारे,तलावाच्या दुरुस्त्या, नदी खोलीकरण, सीएसआर फंडातुन झालेली काम यामुळे पाणी पातळी वाढली आणि त्यामुळे फळबागांचे प्रमाण वाढले. तालुक्यात सर्वाधिक फळबागही
डाळींबाची असुन सात हजार दोनशे नव्वद एकर डाळिंबाचे क्षेत्र आहे.
२३५८ एकर संत्रा लागवड आहे. संत्राला यावर्षात चांगला भाव मिळालाआहे. १०८७ एकर आंबा आहे. परदेशात आंबा निर्यात करणारे अनेक शेतकरी पाथर्डी तालुक्यात आहेत. तालुक्यातील एका शेतकऱ्याने यावर्षी आंबा निर्यातीतुन सुमारे ३२ लाख रुपये कमावले आहेत. सिताफळ ८६० एकर आहे. लिंबु ८४० एकर आहे. पपई-१०० एकर आहे.

पेरु २४३ एकरवर आहेत. अंजीर-२५ एकर आहेत. मोसंबी-१५० एकर आहे. चिकु ११५ एकरा वर आहेत. सर्वाधिक पिक हे डाळींबाचे आहे. डाळींबाला यावर्षी अतिशय चांगला भाव मिळाला आहे. डाळींब उत्पादकांना कधी नव्हता एवढा पैसा मिळाला आहे. कोटयावधी रुपयााचे आर्थिक उत्पन्न फळ बागेतुन शेतक-यांना मिळाले आहे. एक ते दीड कोटी रुपये एका शेतक-याला मिळाल्याचे उदाहरणे पहावयाला मिळाली आहेत. केळी ,जांभुळ, बोर,चिचं अशी पिकेही घेतली जात आहेत.
डाळींब, संत्रा, सिताफळ या पिकातुन यावर्षी चांगले उत्पन्न मिळालेले आहे. दुसरा शेतीला जोडधंदा म्हणुन दुध व्यवसाय तेजीत आहेत. रोज एक लाख लिटर दुध उत्पन्न होते. श्रीवृद्धेश्वर दुध उत्पादक सहकारी संघाचे १८०० ते २००० लिटर दररोज संकलन आहे. खाजगी संकलन केंद्रे व दुध शितकऱण केंद्र असे दुध संकलन केले जाते. दुधातुन रोज पैसा मिळतो. ज्या शेतक-यांकडे फळबाग आहे तेथे जनावरे देखील आहेत. शेतीला लागणारे शेणखत मिळावे यासाठी जनावरे पाळली जातात. दुध मिळते त्यावर घर खर्च चालतो. तालुक्यात रोज चाळीस लाख रुपयाचे दुध विकले जाते. यातुन येणारा पैसा शेतक-यांना घरखर्च भागवितो.