अहिल्यानगर- जिल्ह्यातील बहुचर्चित अर्बन बँकेत २९१ कोटींचा घोटाळा झाला असून, आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे. या गुन्ह्यात संचालक, कर्जदार आरोपी असून, आतापर्यंत १७ जणांना अटक करण्यात आली होती. आता थेट ‘इडी’ने बँकेची प्राथमिक चौकशी सुरू केली असून, २९१ कोटींच्या घोटाळ्याची ‘इडी’कडून चौकशी सुरू असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून समजली.
नगर अर्बन बँकेच्या गैरव्यवहारप्रकरणी माजी संचालक राजेंद्र गांधी यांच्या फिर्यादीवरून तत्कालीन चेअरमन, व्हा. चेअरमन संचालक मंडळ व बँकेच्या अधिकाऱ्यांवर १५० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

फिर्यादीत म्हटले, नगर अर्बन बँकेत २०१४ ते २०१९ या कालावधीतील चेअरमन, संचालक मंडळातील सदस्य व नगर अर्बन बँकेचे अधिकारी जबाबदार पदावर कार्यरत असताना मुख्य शाखेत कर्जप्रकरणांबाबतचे निर्णय घेण्याकरिता संचालक मंडळाच्या सभा घेऊन कर्जप्रकरणे मंजूर केले.
काही कर्जदार व इतर संबधीतांशी संगनमत करून बनावट व्हॅल्युएशन रिपोर्ट, आर्थिक पत्रके व इतर बनावट कागदपत्रे तयार करून व त्यांचा वापर करून नगर अर्बन बँकेची व अन्य खातेदार, ठेवीदार व सभासदांचे आर्थिक नुकसान करून अंदाजे १०० ते १५० कोटी रुपयांची फसवणूक केली आहे, असे फिर्यादीत म्हटले होते. हा गुन्हा गुंतागुंतीचा, क्लिष्ट व किचकट स्वरूपाचा असून, मोठ्या रक्कमेचा अपहार असल्याने गुन्ह्याचा त्तपास पोलीस अधीक्षकांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला.
या गुन्ह्याचा तपासात नगर अर्बन बँकेतील गैरव्यवहारांबाबत तज्ञांचा अहवाल (फॉरेन्सीक ऑडीट रिपोर्ट) प्राप्त करून घेतला आहे. त्यात नगर अर्बन बँकेत अपहार कालावधीत एकूण २९१.२५ कोटींचा अपहार झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत तत्कालीन चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक, कर्जदार असे १७ जणांना अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याची व्याप्ती वाढत असून, आरोपींची संख्याही वाढत आहेत.
दरम्यान, इडी (सक्त वसुली संचनालय) कडून बँकेची सर्व माहिती मागविण्यात आली असल्याचे समजते. इडीकडून बँकची प्राथमिक चौकशी केला जात असून, बँक घोटळ्याचीही चौकशी सुरू आहे. या संबंधी बँकेच्या अधिकाऱ्याला नोटीस पाठवून बोलावून घेण्यात आले होते. बँक अधिकाऱ्यांनी ८ जुलै रोजी इडी कार्यालयात हजर राहुन बँकेची वस्तुस्थिती मांडल्याचेही समजते.
आतापर्यंत बँक किती कर्जदारांनी पैसे भरले. किती कर्जदार पैसे भरण्यास नकार देत आहेत. याबाबत इडीकडून माहिती घेण्यात आली आहे. इडीकडून बँक घोटाळ्यातील आरोपींची चौकशी होणार असल्याचे सूत्रांकडून समजले.
घोटाळ्यातील संशयित आरोपी
प्रदीप जगन्नाथ पाटील (वय ५५, रा. रेणावीकर नगर, सावेडी), राजेंद्र शांतीलाल लुणीया (वय ५६, रा. राऊत मळा, कोठी रोड), मनेष दशरथ साठे (वय ५६, रा. सारसनगर कानडेमळा, अहिल्यानगर), अनिल चंदुलाल कोठारी (वय ६५, रा. आनंद हॉस्पी. मागे, माणीकनगर) अशोक माधवलाल कटारिया (वय ७२, रा. बाजारपेठ, टाकळी ढोकेश्वर), शंकर घनशामदास अंदानी (वय ४५ रा. भगतमळा, सावेडी), मनोज वसंतलाल फिरोदिया (वय ५६ रा. आनंदपार्क, सारसनगर रोड, अहिल्यानगर), प्रवीण सुरेश लहारे (वय ४२ रा. एकनाथनगर, केडगाव), अविनाश प्रभाकर वैकर (वय ६३ रा. सुदर्शन अपार्टमेंट, अहिल्यानगर), अमित वल्लभराय पंडित (वय ५६ रा. संगमनेर जि. अहिल्यानगर), अक्षय राजेंद्र लुणावत (वय ३४, रा. होलेवस्ती चौक, उंड्री, पुणे), राजेंद्र केशव डोळे (वय ६०, रा. २२५, अर्चना अपार्टमेंट, सातारा), डॉ. निलेश विश्वास शेळके (वय ५१, रा. स्टेशन रोड, अहिल्यानगर), केशव भाऊसाहेब काळे (वय ५०, रा. सारोळा कासार, ता. नगर), रविंद्र बबनराव कासार (वय ५३, रा. संवत्सर ता. कोपरगाव जि. अहिल्यानगर), रविंद्र विठ्ठल जेजुरकर (वय ४३, रा. ममदापुर, ता. राहाता, जि. अहिल्यानगर), रुपेश सूर्यकांत भन्साळी (वय ४९, रा. गुलटेकडी पुणे) यांना अटक करण्यात आली होती. सध्या सर्व आरोपी जामीनावर आहेत.