अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी हळद पिकांची लागवड करून होतायेत मालामाल, कसं करायला हवं हळद लागवडीचं नियोजन जाणून घ्या सविस्तर!

Published on -

शेतकरी नेहमीच वेगवेगळे प्रयोग करतात. वेगवेगळ्या भागातील पिके घेऊन त्यातून उत्पादन मिळविण्याचा प्रयत्न केला जातो. अशाच प्रकारे आता आपल्या जिल्ह्यातील शेतकरीही हळद पीक घेऊ लागले आहेत. योग्य नियोजन केल्यास हळद शेतीही फायद्याची ठरू शकते. त्यासाठी नेमके काय केले पाहिजे? लागवड, बीजप्रक्रिया, खते, पाणी व्यवस्थापन याबाबतची थोडक्यात माहिती.

जमीन

उत्तम निचऱ्याची मध्यम काळी, नदी काठची, पोयटा माती अती उत्तम, चुनखडीयुक्त व चोपण जमीन टाळावी पूर्व मशागत : उभ्या आडव्या २ नांगरटी, कुळवणी करणे, जमीन भुसभुशीत करणे.

सुधारित वाण

फुले स्वरूपा, सेलम, कृष्णा, राजापुरी, टेकूरपेटा. पेरणी व लागवडीचे अंतर १५ मे ते जूनचा पहिला आठवडा. ७५ से.मी. अंतरावर सऱ्या पाडून सरीच्या दोन्ही बाजूस ३७.५ ७ ३० सें.मी. अंतरावर वरंब्यामध्ये लागण करावी. ठिबक सिंचनासाठी २० ते २५ सें.मी. उंचीचे १२० सें.मी. रुंदीचे गादी वाफे तयार करून ३० ७ ३० से.मी.वर लागवड करावी. बियाणे गड्ढे बियाणे २५ ते ३० किंटल प्रति हेक्टरी.

जैविक बीजप्रक्रिया

ही बीजप्रक्रिया प्रामुख्याने हळद लागवड करतेवेळी करावी. यामागे अँझोस्पिरीलीयम १० ग्रॅम प्रति लिटर पाणी + स्फुरद विरघळणारे जिवाणू (पीएसबी) १० ग्रॅम प्रति लिटर पाणी + व्हॅम (अट) २५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात घेवून त्यामध्ये बियाणे १० ते १५ मिनिटे बुडवून लगेच लागवडीसाठी वापरावे. ही बीजप्रक्रिया कोणत्याही परिस्थितीत रासायनिक बीजप्रक्रियेच्या अगोदर करु नये. अगोदर रासायनिक बीजप्रक्रिया करुन बियाणे सावलीमध्ये २ ते ३ दिवस सुकवूनच जैविक बीजप्रक्रिया करावी. अंतरपिके घेवडा, मुळा, पालेभाज्या, मेथी, मिरची.

खते

लागवडीपूर्वी प्रति हेक्टरी २५ ते ४० टन चांगले कुजलेले शेणखत मिसळून टाकावे. रासायनिक खतांची मात्रा प्रति हेक्टरी २०० किलो नत्र, १०० किलो स्फुरद व १०० किलो पालाश द्यावी. लागवडीपूर्वी १०० किलो स्फुरद व १०० किलो पालाश द्यावे, नत्राची मात्र दोन समान हफ्त्यामध्ये लागवडीनंतर ६ व १० ते १२ आठवड्याने भरणी करतेवेळी द्यावी.

 

खतांची मात्रा-

शेणखत १५-२० टन/हेक्टर, लिंबोळी पेंड ४ टन/हेक्टर, गांडुळ खत २ टन/हेक्टर.

भरणी करणे

हळदीचे कंद उघडे राहू नयेत यासाठी लागवडीनंतर १० ते १२ आठवड्यांनी मातीने भरणी करावी. भरणी करताना शिफारस केलेल्या खतांच्या मात्रा द्याव्यात. सरी वरंब्यावर लागवड केली असल्यास मजुरांच्या सहायाने शिंपीच्या कुदळीने भरणी करावी. गादी वाफे पद्धतीने लागवड केली असल्यास भरणी मशिनच्या सहायाने भरणी करावी.

फर्टिगेशनही महत्त्वाचे

हळदीचे जास्तीत जास्त उत्पादन मिळविण्याच्या दृष्टीने ठिबक सिंचनाच्या माध्यमातून विद्राव्य खतांचा वापर केल्यास पिकाच्या गरजेनुसार खते देता येतात. त्यासाठी जमिनीचे माती परीक्षण करुनच विद्राव्य खतांचा वापर करावा. फर्टिगेशन करतांना प्रामुख्याने युरिया, फॉस्फरीक अॅसिड आणि पांढरा पोटॅशचा वापर करावा. फर्टिगेशनची सुरुवात हळद लागवडीनंतर १५ दिवसांनी करावी.

महाराष्ट्राच्या मैदानी प्रदेशातील मध्यम काळ्या जमिनीमध्ये हळदीच्या अधिक उत्पादनासाठी आणि जमिनीच्या अधिक सुपीकतेसाठी २५ टन/हेक्टरी शेणखत आणि शिफारशीत खतमात्रेच्या ७५% (१५०:७५:७५ किलो/हेक्टर) विद्राव्य स्वरुपातील नत्र, स्फुरद आणि पालाशची ठिबक सिंचन पद्धतीतून (एक दिवसाआड बाष्पीभवनाच्या ५०% पाणी) द्यावे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!