अहिल्यानगर बाजार समितीत आंब्याची सर्वाधिक आवक, हापूसला ११ हजारापर्यंत भाव तर मोसंबीच्या दरात मोठी घसरण

अहिल्यानगर बाजार समितीत रविवारी फळांची ३७२ क्विंटल आवक झाली. मोसंबीच्या दरात तब्बल ३ हजार रुपयांची घसरण झाली. आंब्यांना विशेषतः हापूसला चांगला दर मिळाला, तर सफरचंदाचे दर २२ हजारांपर्यंत स्थिर राहिले.

Published on -

Ahilyanagar News: अहिल्यानगर- अहिल्यानगर बाजार समितीत रविवारी ३७२ क्विंटल विविध फळांची आवक झाली. चार दिवसांच्या तुलनेत रविवारी फळांची आवक घटल्याचे दिसून आले. यावेळी मोसंबीला १००० ते २५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. मोसंबीच्या भावात सुमारे तीन हजार रुपयांनी घसरण झाली होती. 

हापूस आंब्यांना 11 हजारापर्यंत भाव

डाळिंबाला २००० ते १२ हजारांपर्यंत, तर पपईला जास्तीत जास्त प्रतिक्विंटल १५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. एकूण फळांच्या आवकेचा विचार करता सर्वाधिक आवक आंब्यांची झाली होती. केशर आंब्यांना कमाल ६००० रुपयांपर्यंत भाव मिळाला. हापूस आंब्यांना जास्तीत जास्त ११५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला.

सर्वाधिक आंब्यांची आवक

अहिल्यानगर बाजार समितीत रविवारी केशर आंब्यांची सर्वाधिक १६७ क्विंटलवर आवक झाली होती. केशर आंब्यांना प्रतिक्विंटल ३००० ते ६००० रुपये भाव मिळाला. हापूस आंब्यांची ८ क्विंटल आवक झाली होती. हापूसला ८००० ते ११५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. गावरान आंब्यांची ८ क्विंटल आवक झाली होती. गावरान आंब्यांना २००० ते ३००० रुपये भाव मिळाला. लंगडा आंब्याची ३ क्विंटलवर आवक झाली होती. लंगडा आंब्यांना प्रतिक्विंटल १००० ते २५०० पर्यंत भाव मिळाला. 

मोसंबीची ३ क्विंटल आवक

मोसंबीची ३ क्विंटल आवक झाली होती. मोसंबीला १००० ते २५०० रुपये भाव मिळाला.संत्र्यांची ४ क्विंटल आवक झाली होती. संत्र्याला प्रतिक्विंटल २००० ते ६००० रुपये भाव मिळाला. डाळिंबांची १० क्विंटल आवक झाली होती. डाळिंबांना २ हजार ते १२ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. पपईची १४ क्विंटल आवक झाली होती. पपईला प्रतिक्विंटल ५०० ते १५०० रुपये भाव मिळाला.

सफरचंदाला १२ हजार ते २२ हजार रुपयांपर्यंत भाव

बाजार समितीत अननसाची १ क्विंटल २६ किलो आवक झाली होती. अननसाला २५०० ते ४००० रुपये भाव मिळाला. चिकूची १ क्विंटल ८४ किलो आवक झाली होती. चिकूला २००० ते ४००० रुपये भाव मिळाला. सफरचंदांची ४ क्विंटल ६० किलो आवक झाली होती. सफरचंदाला १२ हजार ते २२ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. 

जांभळाला ५ ते १० हजारापर्यंत भाव

कलिंगडाची १९ क्विंटल आवक झाली होती. कलिंगडाला प्रतिक्विंटल ५०० त १००० रुपये भाव मिळाला. जांभळाची ८ क्विंटल आवक झाली होती. जांभळाला ५ ते १० हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. केळीची ४ क्विंटल आवक झाली होती. यावेळी केळीला प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये भाव मिळाला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News