तब्बल 68 हजारांची सूट आणि जबरदस्त फिचर्सने भरलेली कार, संधी दवडू नका!

Hyundai i10 Nios वर एप्रिलमध्ये तब्बल 68,000 पर्यंत बंपर सूट मिळतेय. फिचर्स, सेफ्टी आणि परफॉर्मन्ससह ही कार फक्त5.98 लाखात खरेदी करता येणार आहे. ग्राहकांसाठी ही एक उत्तम संधी असणार आहे.

Published on -

Hyundai i10 Nios | एप्रिल 2025 मध्ये Hyundai Motor India ने ग्राहकांसाठी खास सवलत योजना आणली आहे. जर तुम्ही बजेटमध्ये स्टायलिश, सुरक्षित आणि फिचर्सने भरलेली कार शोधत असाल, तर Hyundai Grand i10 Nios हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. कंपनी सध्या या कारवर 68,000 पर्यंतची सूट देत असून, ही ऑफर फक्त मर्यादित कालावधीसाठी आहे.

सवलतीत मिळणाऱ्या ऑफर्स-

Hyundai Grand i10 Nios ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 5.98 लाख असून, पेट्रोल आणि CNG दोन्ही मॉडेल्सवर ही सूट लागू होते. शिवाय, ही सूट मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक (AMT) ट्रान्समिशन प्रकारांवर देखील मिळते. कंपनी ग्राहकांना कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट डिस्काउंट या माध्यमातून एकत्रित 68,000 पर्यंतचा फायदा देत आहे. महत्त्वाचं म्हणजे, Hyundai 20 एप्रिलपासून आपल्या कारच्या किंमती वाढवणार आहे, त्यामुळे ऑफर संपण्याआधी खरेदी करणं फायद्याचं ठरेल.

इंजन आणि परफॉर्मन्स

Hyundai i10 Nios मध्ये 1.2-लिटर Kappa पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे, जे 83 PS ची पॉवर आणि 113.8 Nm टॉर्क जनरेट करतं. यात 5-स्पीड मॅन्युअल आणि स्मार्ट ऑटो AMT ट्रान्समिशनचा पर्याय दिला आहे. यामुळे ड्रायव्हिंग अधिक स्मूथ आणि इंधन कार्यक्षम ठरतं.

इतर फिचर्स

सुरक्षेच्या दृष्टीने Grand i10 Nios मध्ये साइड आणि कर्टन एअरबॅग्स, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, फूटवेल लाइटिंग आणि टाइप-C फ्रंट USB चार्जर यासारखी फिचर्स देण्यात आली आहेत. नवीन एलईडी DRLs, ग्लॉसी ब्लॅक फ्रंट ग्रिल, आणि कनेक्टेड LED टेल लॅम्प्स कारला अधिक आकर्षक बनवतात. कारच्या आतील भागात नवीन राखाडी अपहोल्स्ट्री आणि वेव्ही डॅशबोर्ड डिझाइन दिलं आहे, जे एक प्रीमियम लुक देते.

तसेच यामध्ये क्रूझ कंट्रोल, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी आणि सेगमेंटमध्ये सर्वोत्तम असा 8-इंची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळतो. त्याशिवाय, इको कोटिंग तंत्रज्ञान, मागील एसी व्हेंट्स, आपत्कालीन स्टॉप सिग्नल, मागील पॉवर सॉकेट, आणि कूल्ड ग्लोव्ह बॉक्सही यात आहे.

रंग आणि इंटीरियर

Hyundai Grand i10 Nios ही कार 6 मोनोटोन आणि 2 ड्युअल टोन रंग पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये Titan Grey, Polar White, Fiery Red, Spark Green, Typhoon Silver आणि Teal Blue यांचा समावेश आहे. फँटम ब्लॅक रूफसह पोलर व्हाइट आणि स्पार्क ग्रीन हे ड्युअल टोन पर्याय आकर्षक लुक देतात. इंटीरियरमध्ये ताज्या राखाडी अपहोल्स्ट्री आणि वेव्ही डॅशबोर्ड डिझाईन दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News