Maruti Suzuki Offer Discount : स्वस्तात कार खरेदी करण्याची जबरदस्त संधी, पहा मारुतीची ‘ही’ ऑफर…

Content Team
Published:
Maruti Suzuki Offer Discount

Maruti Suzuki Offer Discount : जर तुम्ही मारुती सुझुकीचे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनी सध्या आपल्या जबरदस्त वाहनांवर बंपर सूट देत आहे. याचा फायदा घेऊन तुम्ही या कंपनीची वाहने अत्यंत स्वस्त दरात खरेदी करू शकता. कपंनी कोणत्या गाड्यांवर सूट देत आहे पाहूया…

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मारुती सुझुकी आपल्या ग्रँड विटारा SUV, Fronx आणि XL6 MPV वर ग्राहकांना बंपर डिस्काउंट ऑफर देत आहे. याशिवाय कंपनी मारुती बलेनो, सियाज आणि इग्निसवरही सूट देत आहे.

ग्रँड विटारा

सध्या कपंनी ग्रँड विटारावर 74 हजार रुपयांची सूट देत आहे. या वाहनावर 66 हजार रुपयांपेक्षा जास्त सूट आधीच उपलब्ध आहे. यासोबतच हायब्रीड प्रकारांवर 3 वर्षांची विस्तारित वॉरंटी देखील उपलब्ध आहे. म्हणजेच या वाहनावर एकूण 1.4 लाख रुपयांपर्यंतची बचत होऊ शकते. याच्या अल्फा व्हेरिएंटवर 64 हजार रुपये, सिग्मा सीएनजीवर 34 हजार रुपयांची सूट मिळत आहे. ग्रँड विटाराचे हायब्रीड मॉडेल 27.97kmpl मायलेज देण्यासाठी ओळखले जाते. या गाडीची एक्स-शोरूम किंमत 10.99 लाख ते 19.93 लाख रुपये आहे.

मारुती सुझुकी फ्रँक्स

मारुती फ्रँक्स वर 20 हजार रुपयांपेक्षा जास्त सवलत ऑफर आधीच उपलब्ध आहे. व्हेलॉसिटी एडिशन आल्यानंतर कंपनी टर्बो मॉडेलच्या उर्वरित स्टॉकवर 77 हजार रुपयांची सूट देत आहे. या वाहनाच्या स्टँडर्ड पेट्रोल व्हर्जनवर 32,500 रुपयांपर्यंत आणि CNG व्हेरिएंटवर 12,000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. मारुती फ्रँक्सची एक्स-शोरूम किंमत 7.29 लाख ते 12.88 लाख रुपये आहे.

मारुती XL6

मारुती XL6 वर 15 हजार रुपयांची अतिरिक्त सूट उपलब्ध आहे. MPV च्या पेट्रोल व्हेरियंटवर 40 हजार रुपयांपर्यंतचा फायदा मिळत आहे. या वाहनाच्या सीएनजी व्हेरियंटवर 25 हजार रुपयांपर्यंतची सूट आहे. या वाहनाची एक्स-शोरूम किंमत 11.61 लाख ते 14.61 लाख रुपये आहे. तथापि, या सवलतीच्या ऑफर देखील भिन्न शहरे आणि डीलरशिपवर अवलंबून आहेत आणि त्यामध्ये थोडा फरक असेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe