Maruti Suzuki ची नवी कार बनली मायलेज किंग! ह्युंदाई आणि होंडाला देणार टक्कर

मारुती सुझुकी ही भारतातील एक अत्यंत लोकप्रिय आणि विश्वसनीय कार निर्माता कंपनी आहे.या कंपनीच्या कार विविध सेगमेंटमध्ये मोठ्या प्रमाणावर विकल्या जातात. 2024च्या नोव्हेंबर महिन्यात मारुतीने आपल्या सेडान सेगमेंटमधील सर्वाधिक विकली जाणारी कार मारुती डिझायरचे नवीन आणि अपडेटेड व्हेरियंट सादर केले आहे.

Published on -

Best Mileage Car:- मारुती सुझुकी ही भारतातील एक अत्यंत लोकप्रिय आणि विश्वसनीय कार निर्माता कंपनी आहे.या कंपनीच्या कार विविध सेगमेंटमध्ये मोठ्या प्रमाणावर विकल्या जातात. 2024च्या नोव्हेंबर महिन्यात मारुतीने आपल्या सेडान सेगमेंटमधील सर्वाधिक विकली जाणारी कार मारुती डिझायरचे नवीन आणि अपडेटेड व्हेरियंट सादर केले आहे.

किती देते मायलेज?

हे नवीन व्हॅरिएंट पेट्रोल आणि सीएनजी अशा दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. पेट्रोल व्हॅरिएंटला 24.79 किलोमीटर प्रति लिटर मायलेज मिळते तर सीएनजी व्हॅरिएंट 33.73 किलोमीटर प्रति किलो मायलेज देते.या मायलेजने कारला एक विशेष स्थान मिळवून दिले आहे.खासकरून अशा गाड्यांसाठी ज्या कमी इंधन वापरून अधिक अंतर पार करण्यास सक्षम असतात.

मायलेज ही एक प्रमुख बाब आहे जी ग्राहक गाडी खरेदी करताना विचारात घेतात. मारुतीच्या गाड्या हे त्यांचे प्रमुख आकर्षण ठरतात.कारण त्यांचे मायलेज इतर कंपन्यांच्या गाड्यांपेक्षा खूप जास्त असते. त्यामुळे या गाड्यांचा वापर लांबच्या प्रवासांसाठी आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असतो.

तथापि मारुतीच्या गाड्यांमध्ये काही ठिकाणी फीचर्स आणि डिझाईनची कमी असू शकते. याचे उदाहरण म्हणजे होंडा आणि ह्युंडाईच्या गाड्या ज्या आपल्या उत्तम फीचर्स आणि आकर्षक डिझाईनसाठी ओळखल्या जातात.

मारुती डिझायर बेस व्हेरिएंटची किंमत

मारुती डिझायरच्या बेस व्हॅरिएंटची किंमत 6.79 लाख रुपये आहे. तर टॉप व्हॅरिएंट 10.14 लाख रुपये किंमतीला उपलब्ध आहे. याच्या तुलनेत ह्युंदाई व्हेन्यूच्या बेस व्हॅरिएंटची किंमत 7.94 लाख रुपये आहे. तर टॉप व्हॅरिएंट 13.62 लाख रुपये किंमतीला मिळते.होंडा सिव्हिकच्या डिझेल ट्रिमची सुरुवात 20.56 लाख रुपयांपासून होते आणि टॉप व्हॅरिएंटची किंमत 22.36 लाख रुपये आहे.

ह्युंदाई व्हेन्यू ही एक कॉम्पॅक्ट एसयूव्ही असून मायलेजच्या बाबतीत मारुती डिझायरशी चांगली स्पर्धा करते. ARAI च्या माहितीनुसार, ह्युंदाई व्हेन्यूचे पेट्रोल व्हॅरिएंट 18.31 ते 24.2 किलोमीटर प्रति लिटर मायलेज देते.व्हेन्यूचे डिझेल व्हॅरिएंट 24.2 किलोमीटर मायलेज देते.होंडा सिव्हिक जी एक लक्झरी सेडान असून त्याचे डिझेल व्हॅरिएंट 26.8 किलोमीटर प्रतिलिटर मायलेज देते.

गाडी खरेदी करताना ग्राहकांचे लक्ष विविध बाबींवर असते.जसे की, लूक, फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि मायलेज. परंतु मायलेज हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक असतो.

कारण जर मायलेज जास्त असेल तर गाडी चालवण्याचा खर्च कमी होतो. जो दर महिन्याला ग्राहकांना फायदा देतो. यामुळेच मारुतीच्या गाड्या खूप लोकप्रिय आहेत.कारण त्यांच्यात कमी खर्चात जास्त मायलेज मिळवण्याची क्षमता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News