फक्त 4 लाखात घरी आणा AMT व्हेरियंट Renault Kwid ची जबरदस्त ऑफर

या एप्रिल महिन्यात रेनॉल्ट क्विडवर तब्बल 78,000 पर्यंतची सूट मिळणार असल्याने बाजारात उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. नवीन रंग पर्याय, अधिक सुरक्षा आणि AMT व्हेरियंटमुळे ही कार पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

Updated on -

Renault Kwid Offers : भारतीय कार बाजारात पुन्हा एकदा एंट्री-लेव्हल कार रेनॉल्ट क्विड चर्चेत आली आहे. एप्रिल 2025 मध्ये कंपनीकडून या कारवर भरघोस सूट आणि आकर्षक ऑफर्स दिल्या जात आहेत. कंपनीकडे 2024 वर्षीचे जुने स्टॉक शिल्लक असल्यामुळे तो क्लिअर करण्यासाठी 78,000 रुपयांपर्यंत सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत.

2024 मॉडेल क्विडवर कंपनीने मोठी सूट दिली आहे. यात 40,000 रुपयांपर्यंतची रोख सूट, 15,000 रुपयांपर्यंतचे एक्सचेंज आणि लॉयल्टी बेनिफिट, 8,000 रुपयांपर्यंतची कॉर्पोरेट सूट आणि 3,000 रुपयांपर्यंत रेफरल बोनस समाविष्ट आहे. दुसरीकडे, 2025 मॉडेल्सवरही एकूण 48,000 रुपयांपर्यंतचा फायदा मिळू शकतो. मात्र, बेस व्हेरियंट RXE आणि RXL (O) वर रोख किंवा एक्सचेंज ऑफर लागू नसेल.

78,000 ची सूट मिळणार –

रेनॉल्ट क्विडची एक्स-शोरूम किंमत 4.69 लाख रुपये पासून सुरू होते आणि टॉप व्हेरियंटसाठी ती 6.44 लाख रुपये आहे. या कारमध्ये 999cc, 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, जे 68 bhp पॉवर आणि 91 Nm टॉर्क निर्माण करते. तिची लांबी 3,731 mm असून, ग्राउंड क्लीयरन्स 184 mm आहे. बूट स्पेस 279 लिटरची असून ही कार 5 आकर्षक ड्युअल टोन रंगांत मिळते.

RXL (O) व्हेरियंटमध्ये 8-इंच टचस्क्रीन मीडिया नॅव्ह सिस्टम आहे, जी तिला या सेगमेंटमधील सर्वात परवडणारी स्मार्ट हॅचबॅक बनवते. ऑटोमॅटिक कारला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन, कंपनीने Easy-R AMT व्हेरियंटही बाजारात सादर केला आहे.

कुणासोबत आहे स्पर्धा?

सुरक्षिततेच्या बाबतीतही क्विडने आता पायरी चढली आहे. यात 14 पेक्षा जास्त सुरक्षा फीचर्स आहेत. यामध्ये ESP, ट्रॅक्शन कंट्रोल, हिल स्टार्ट असिस्ट, TPMS, सर्व सीट्ससाठी सीटबेल्ट रिमाइंडर आणि ABS + EBD यांचा समावेश आहे.

नवीन ड्युअल टोन रंगांमध्ये ब्लॅक रूफसह पांढरी, पिवळी, लाल, सिल्व्हर आणि निळ्या रंगाच्या बॉडी पर्यायांचा समावेश आहे. भारतीय बाजारात क्विडची स्पर्धा Maruti Alto K10 आणि Tata Tiago सोबत आहे, परंतु ही कार सध्या या सेगमेंटमधील सर्वात कमी विक्री होणाऱ्या हॅचबॅकपैकी एक मानली जाते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe