Discount on Renault Car : त्वरित खरेदी करा या 3 कार! होईल 65 हजारांची बचत, कुठे मिळत आहे संधी? जाणून घ्या

Ahmednagarlive24 office
Published:

Discount on Renault Car : मागील महिन्यात Renault च्या शक्तिशाली कार्सवर 62 हजार रुपयांची सवलत देण्यात आली होती. अशातच आता पुन्हा एकदा या महिन्यात Renault च्या कार्सवर सवलत देण्यात येत आहे. आता कंपनीच्या 3 कार्सवर 65,000 रुपयांची सवलत देण्यात येत आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे लक्षात घ्या की अशी शानदार ऑफर फक्त 30 जूनपर्यंत उपलब्ध असणार आहे. यात रोख सवलत, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट सूट यांसारखी ऑफर उपलब्ध करून दिली आहे. ही ऑफर क्विड, किगर आणि ट्रायबरवर मिळत आहे.

1. Renault Kwid

कंपनीकडून आता Kwid च्या BS6 फेज 2 मॉडेलवर 57,000 रुपयांचे एकूण फायदे देण्यात येत आहे. यात ग्राहकांना 15 रुपयांची रोख सवलत, 20,000 रुपयांची एक्सचेंज ऑफर आणि 12,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट यांचा लाभ घेता येत आहे. तसेच कंपनी 10 हजार रुपयांचा लॉयल्टी बोनस देत आहे.

2. Renault Triber

कंपनीकडून ट्रायबरच्या BS6 फेज 2 मॉडेलवर एकूण 45,000 रुपयांचे फायदे दिले जात आहे. यामध्ये ग्राहकांना 15 रुपयांची रोख सूट, 20,000 रुपयांची एक्सचेंज ऑफरचा लाभ घेता येईल. तसेच कंपनी यावर 10 हजार रुपयांचा लॉयल्टी बोनस देत आहे. परंतु, हे लक्षात घ्या की तुम्हाला यात कॉर्पोरेट सवलतीचा लाभ मिळणार नाही.

3. Renault KIGER

कंपनीकडून KIGER च्या BS6 फेज 2 मॉडेलवर एकूण 65,000 रुपयांचे फायदे देण्यात येत आहे. यामध्ये ग्राहकांना 25 रुपयांची रोख सवलत, 20,000 रुपयांची एक्सचेंज ऑफर आणि 12,000 रुपयांची कॉर्पोरेट सवलतीचा लाभ घेता येत आहे. तसेच कंपनी 10 हजार रुपयांचा लॉयल्टी बोनस देत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe