भारतीय SUV मार्केटमध्ये टोयोटा फॉर्च्युनरचं वेगळंच वर्चस्व आहे. मोठ्या रोड प्रेझेन्सपासून जबरदस्त ऑफ-रोड क्षमतांपर्यंत, या गाडीने आपल्या सेगमेंटमध्ये एक मजबूत स्थान निर्माण केलं आहे. पण जर तुम्हाला फॉर्च्युनरच्या बजेटमध्ये एक लक्झरीयस आणि फीचर-पॅक्ड SUV मिळाली, त्यावर भरघोस सूट मिळाली आणि वरून तुम्ही एका छोटी कारच्या किमतीएवढे पैसे वाचवू शकला, तर? ऐकायला स्वप्नासारखं वाटत असलं तरीही हे वास्तव आहे!
SUV खरेदीसाठी परफेक्ट संधी
MG Motors सध्या आपल्या फ्लॅगशिप Gloster SUV वर मोठ्या प्रमाणावर सूट देत आहे. जर तुम्ही MY2024 मॉडेल घेत असाल, तर 5.5 लाख रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळू शकतो, ज्यामध्ये 4.5 लाख रुपयांची डायरेक्ट रोख सूट आणि 1 लाख रुपयांचा एक्सचेंज बोनस समाविष्ट आहे. MY2025 मॉडेलसाठी 4 लाख रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट आणि 50,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस उपलब्ध आहे.

ही सूट इतकी मोठी आहे की तुम्ही वाचवलेल्या रकमेने सहजच एक छोटी कार उदा. मारुती अल्टो खरेदी करू शकता! म्हणजेच, एक मोठी SUV घेताना तुम्हाला एका छोटी कारएवढी रक्कम वाचते.
MG Gloster फीचर्स
MG Gloster ही फक्त एक मोठी SUV नाही, तर प्रीमियम फीचर्स आणि दमदार परफॉर्मन्स देणारी एक लक्झरीयस कार आहे. यात 2.0-लिटर ट्विन-टर्बो डिझेल engine, ऑटोमॅटिक गिअरबॉक्स, आणि विविध driving modes मिळतात, जे ऑफ-रोडिंगला एक वेगळाच अनुभव देतात. 7-सीटर लेआउट, premium leather seats, डिजिटल instrument cluster, ADAS (Advanced Driver Assistance System) सारखी safety features, आणि जबरदस्त रोड प्रेझेन्स यामुळे ही SUV एक उत्तम पर्याय ठरते.
इतर MG मॉडेल्सवरही मोठ्या सवलती
जर तुम्हाला Gloster नाही घ्यायची, तरीही MG Motorsच्या इतर SUV आणि इलेक्ट्रिक कारवर चांगल्या सवलती मिळत आहेत.
MG Hector आणि Hector Plus – MY2024 मॉडेल्सवर 2.2 लाख रुपयांपर्यंत आणि MY2025 मॉडेल्सवर 70,000 रुपयांपर्यंत सूट
MG Astor – MY2024 साठी 1.45 लाख रुपयांपर्यंत आणि MY2025 साठी 70,000 रुपयांची सूट
MG Comet EV – MY2024 वर 45,000 रुपयांची आणि MY2025 वर 40,000 रुपयांची सूट
SUV खरेदीसाठी योग्य वेळ
हे लक्षात ठेवा की या ऑफर्स शहरानुसार आणि डीलरशिपनुसार बदलू शकतात. त्यामुळे तुमच्या जवळच्या MG शोरूममध्ये भेट देऊन ऑफर्सची संपूर्ण माहिती घ्या. जर तुम्ही मोठी आणि प्रीमियम SUV खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. कमी किमतीत शानदार फीचर्स, दमदार performance, आणि एक जबरदस्त road presence मिळवायची असेल, तर MG Gloster एक उत्तम पर्याय ठरू शकतो!