नवीन कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ कारच्या खरेदीवर मिळणार तब्बल 90 हजाराचा डिस्काउंट, वाचा सविस्तर

Tejas B Shelar
Published:
Honda Car Discount Offer

Honda Car Discount Offer : नवीन कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. विशेषता ज्यांना सेडान कार खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी ही बातमी खूपच खास राहणार आहे. खरे तर भारतीय ग्राहकांमध्ये गेल्या काही वर्षांपासून एसयूव्ही कारची डिमांड वाढली आहे. तरुण वर्गात एसयुव्ही कारची मोठी क्रेझ आहे.

मात्र असे असले तरी आजही असे अनेकजण आहेत जें की सेडान कारला पसंती दाखवतात. दरम्यान, जर तुम्हालाही येत्या काही दिवसांत होंडा कंपनीची सेडान कार खरेदी करायची असेल तर तुम्हाला हजारो रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे.

त्यामुळे कार खरेदीचे स्वप्न कमी किंमतीत पूर्ण होणार आहे. होंडा या दिग्गज ऑटो कंपनीच्या या जबरदस्त ऑफरमुळे ग्राहकांचे हजार रुपये वाचणार आहेत. खरे तर होंडा ही एक आघाडीची कार उत्पादक कंपनी आहे.

हीच आघाडीची कार उत्पादक कंपनी होंडा या ऑगस्ट महिन्यात त्यांच्या लोकप्रिय सेडान सिटीवर बंपर सूट ऑफर करत आहेत. जर तुम्ही ऑगस्ट 2024 मध्ये Honda City खरेदी केली तर तुम्हाला 88,000 रुपयांची कमाल डिस्काउंट मिळणार आहे.

तसेच, Honda City Hybrid वर तुम्हाला Rs 90,000 पर्यंत डिस्काउंट ऑफर मिळणार आहे. या ऑफरमध्ये ग्राहकांना रोख सवलत, एक्सचेंज बोनस आणि लॉयल्टी बोनसचा लाभ मिळणार आहे. होंडा सिटी ही एकेकाळी विक्रीच्या बाबतीत देशातील सर्वाधिक विकली जाणारी सेडान कार होती.

यामुळे जर तुम्हालाही ही गाडी तुमच्या अंगणात उभी करायची असेल तर हा काळ ही गाडी खरेदी करण्यासाठी सर्वात बेस्ट ठरणार आहे. कारण की या गाडीच्या खरेदीवर कंपनीकडून तब्बल 90 हजाराचा डिस्काउंट दिला जाणार आहे. दरम्यान आता आपण या गाडीचे फीचर्स आणि पावर ट्रेन या संदर्भात अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कस राहणार पॉवरट्रेन ?

Honda City चे पावर ट्रेन बद्दल आपण सर्वप्रथम माहिती जाणून घेऊया. या कारला 1.5-लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे जे की, जास्तीत जास्त 121bhp पॉवर आणि 145Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. या कारचे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल आणि 7-स्टेप CBT गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.

1.5-लीटर ऑटोमॅटिक वेरिएंटमध्ये 17.8 किलोमीटर प्रति लिटर मायलेज देऊ शकते असा कंपनीचा दावा आहे. तर 1.5-लीटर CBT प्रकार 18.4 kmpl पर्यंत मायलेज देते. दुसरीकडे, होंडा सिटीची मजबूत हायब्रिड आवृत्ती आपल्या ग्राहकांना 27.13 kmpl मायलेज देत आहे.

फिचर्स कसे राहणार ?

आता आपण या गाडीचे फीचर्स कसे आहेत याबाबत थोडक्यात माहिती पाहणार आहोत. या कारच्या आतील भागात 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले कनेक्टिव्हिटी, रेन सेन्सिंग वायपर्स, वायरलेस फोन चार्जर, क्रूझ कंट्रोल आणि सनरूफ यांसारखें फिचर्स देण्यात आले आहेत.

याशिवाय या कारमध्ये 6 एअरबॅग्ज, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, रीअरव्ह्यू कॅमेरा आणि सुरक्षेसाठी ADAS तंत्रज्ञानही देण्यात आले आहे. Honda City ही एक लोकप्रिय 5-सीटर कार आहे. या गाडीच्या किमती बाबत बोलायचं झालं तर भारतीय कार बाजारात याची एक्स-शोरूम किंमत 12.08 लाख ते 20.55 लाख रुपयांदरम्यान आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe