४ फेब्रुवारी २०२५ मुंबई : होंडा कार्स इंडिया लि. (एचसीआयएल) या भारतातील आघाडीच्या प्रीमियम कार उत्पादक कंपनीने आपले लोकप्रिय मॉडेल होंडा सिटीची नवीन अॅपेक्स एडिशन लाँच केली आहे.मर्यादित आकारमानामध्ये उपलब्ध अॅपेक्स एडिशन मॅन्युअल ट्रान्समिशन (एमटी) व कंटिन्युअस्ली व्हेरिएबल ट्रान्समिशन (सीव्हीटी) मध्ये ऑफर करण्यात येईल आणि होंडा सिटीच्या व्ही व व्हीएक्स श्रेणीवर आधारित आहे.
देशामध्ये सर्वाधिक काळापासून कार्यरत असलेल्या होंडा सिटीने ग्राहकांना १९९८ मध्ये पहिल्यांदा लाँच झाल्यापासून दर्जात्मक डिझाईन बदल आणि
तंत्रज्ञान अपग्रेड्ससह आनंदित केले आहे.सिटीची स्टायलिश व आरामदायी डिझाईन अधिक आकर्षक करत,तसेच व्ही व व्हीएक्स श्रेणींमध्ये अधिक मूल्यांची भर करत अॅपेक्स एडिशन सुधारणांच्या नवीन प्रीमियम पॅकेजसह येते, जी सर्व रंगांच्या पर्यायांमध्ये ऑफर करण्यात येईल.
याबाबत होंडा कार्स इंडिया लि. च्या विपणन व विक्री विभागाचे उपाध्यक्ष कुणाल बहल म्हणाले, होंडा सिटी भारतात अत्यंत यशस्वी ब्रँड राहिला आहे, जेथे तो ग्राहकांमध्ये महत्त्वाकांक्षी दर्जाचा आनंद घेत आहे.हा ब्रँड होंडा कार्स इंडियासाठी प्रमुख व्यवसाय आधारस्तंभ आहे.अॅपेक्स एडिशनच्या लाँचसह आमचा ग्राहकांना अधिक सुधारित व प्रीमियम पॅकेज देण्याचा मनसुबा आहे.
अॅपेक्स एडिशनची वैशिष्ट्ये
■ लक्झरीअस बीज इंटीरिअर्स
■ प्रीमियम लेदरेट इन्स्ट्रूमेंट पॅनेल
■ लेदरेट कन्सोल गार्निश
■ प्रीमियम लेदरेट डोअर पॅडिंग
■ इन्स्ट्रूमेंट पॅनेल व डोअर पॉकेटवर रिदमिक अॅम्बियण्ट लाइट्स
■ अॅपेक्स एडिशन एक्सक्लुसिव्ह सीट कव्हर्स आणि कूशन्स
■ फेण्डर्सवर अॅपेक्स एडिशन बॅज
■ ट्रंकवर अॅपेक्स एडिशन एम्ब्लेम