New Bike : आगामी दिवाळी व दसऱ्याच्या अनुशंघाने ऑटोमोबाईल मार्केट सुसज्ज झाले आहे. अनेक कंपन्या आपल्या नवीन बाईक लॉन्च करत आहेत. आता होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने आगामी सणासुदीच्या हिशोबाने H’ness CB350 आणि CB350RS बाईक लाँच केल्या आहेत.
होंडा एचनेस सीबी 350 लिगेसी एडिशनची दिल्लीत एक्स-शोरूम किंमत 2.16 लाख रुपये आहे. नवीन होंडा CB350RS ची किंमत 2.19 लाख रुपये असण्याची शक्यता आहे.
नव्या बाईकचे बुकिंग सुरू
होंडाच्या या दोन मोटारसायकलींचे बुकिंग सुरू झाले आहे. देशातील होंडाच्या बिगविंग शोरूममधून ग्राहक H’ness CB350 आणि CB350RS ऑर्डर करू शकतात. जुन्या मॉडेलच्या तुलनेत नवीन होंडा H’ness CB350 आणि CB350RS मध्ये काही कॉस्मेटिक अपडेट्स देण्यात आले आहेत. बाकी स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स पूर्वीसारखेच आहेत.
होंडा एच’नेस’ CB350 लीगेसी एडिशन
या बाईकची स्टाइलिंग आणि डिझाइन जुन्या बाइकसारखीच आहे. बाईकच्या एक्सटीरियरमध्ये नवीन ग्राफिक्स आणि पर्ल सायरन ब्लू कलर देण्यात आला आहे. त्याच्या फ्यूल टॅन्कवर लिगेसी एडिशन बॅज दिसत आहे.
होंडा CB350 RS न्यू ह्यू एडिशन
Honda CB350 RS न्यू ह्यू एडिशन स्पोर्ट्स रेड आणि अॅथलेटिक ब्लू मेटॅलिक या दोन नवीन कलर ऑप्शन मध्ये येत आहे. त्याच्या फ्यूल टॅन्कवर शानदार ग्राफिक्स आणि दोन्ही चाकांवर आणि फेंडरवर स्ट्रिप्स दिसतात. बॉडी कलर रियर ग्रॅब हँडल आणि हेडलाईट कव्हर देखील यामध्ये देण्यात आले आहे.
फीचर व इंजिन स्पेसिफिकेशन
स्पेसिफिकेशनच्या बाबतीत होंडा एचनेस सीबी 350 आणि होंडा CB350RS स्पेशल एडिशन डिजिटल आणि अॅनालॉग इंस्ट्रूमेंट क्लस्टरसह सुसज्ज आहेत. याशिवाय यात होंडा स्मार्टफोन व्हॉईस कंट्रोल सिस्टिम देखील पाहायला मिळते. यात होंडा सिलेक्टेबल टॉर्क कंट्रोल सिस्टिम देण्यात आली आहे.
या प्रणालीला ट्रॅक्शन कंट्रोल असेही म्हणतात. होंडाच्या सीबी 350 मध्ये 4 स्ट्रोक, सिंगल सिलिंडर, एअर कूल्ड 48.36cc इंजिन आहे. हे इंजिन 5 स्पीड गिअरबॉक्ससह 21 बीएचपी पॉवर आणि 30 एनएम पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. रिअर व्हीलवर पॉवर ट्रान्सफर करण्यासाठी बाइकमध्ये स्लिप आणि असिस्ट क्लचसोबत ट्रान्समिशन चा पर्याय देण्यात आला आहे.