Indias Cheapest CNG Car : गेल्या काही वर्षांमध्ये भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती विक्रमी वाढल्या आहेत. पेट्रोलच्या किमतीने शंभराचा आकडा कधीच गाठला आहे. डिझेलच्या किमती देखील त्याच टप्प्यात आहेत. यामुळे वाहनचालक खूपच त्रस्त असून इंधनाच्या वाढत्या किमती सर्वसामान्यांची डोकेदुखी वाढवत आहेत. हेच कारण आहे की आता पेट्रोल आणि डिझेल वाहनांच्या तुलनेत सीएनजी तसेच इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य दाखवले जात आहे.
यामुळे आता ऑटो कंपन्या सीएनजी आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीला अधिक वेग देत आहेत. विशेष बाब अशी की आत्तापर्यंत फक्त चार चाकी गाडीचं सीएनजी मध्ये उपलब्ध होती. मात्र बजाज कंपनीने टू व्हीलर गाडी देखील सीएनजी मध्ये उपलब्ध करून दिली आहे.
नुकत्याच काही दिवसांपूर्वी बजाजने जगातील पहिली सीएनजी टू व्हीलर इंडियन मार्केटमध्ये लॉन्च केली आहे. दरम्यान आज आपण ज्या लोकांना स्वस्त सीएनजी कार खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. आज आपण देशातील सर्वात स्वस्त सीएनजी कारची माहिती पाहणार आहोत.
ही आहे देशातील सर्वात स्वस्त सीएनजी कार
देशातील सर्वात स्वस्त सीएनजी कार मारुती सुझुकी कंपनीची आहे. मारुती सुझुकी ही देशातील सर्वाधिक कार विक्री करणारी कंपनी आहे. या कंपनीच्या पोर्टफोलिओ मध्ये असणारी मारुती सुझुकी अल्टो के 10 ही देशातील सर्वात स्वस्त कार आहे.
Alto K10 चे Tour H1 CNG हे सीएनजी वैरियंट आहे. ही देशातील सर्वात स्वस्त सीएनजी कार आहे. या सीएनजी वॅरियंटची एक्स शोरूम किंमत 5 लाख 70 हजार 500 रुपये एवढी आहे. कंपनीने सांगितल्याप्रमाणे, ही गाडी एक किलो सीएनजी मध्ये 33.85 किलोमीटर पर्यंत धावते.
कसे आहेत फिचर्स?
ही मारुती सुझुकी कंपनीचीचं नाहीतर देशातील सर्वात स्वस्त हॅचबॅक कार आहे. या गाडीत नवीन-जनरल K-सिरीज 1.0L ड्युअल जेट, ड्युअल VVT इंजिन आहे. हे इंजिन 49kW (66.62PS)@5500rpm आणि कमाल 89Nm@3500rpm वर टॉर्क जनरेट करत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
या गाडीचे ऑटोमॅटिक वेरिएंट 24.90 km/l मायलेज देते आणि मॅन्युअल व्हेरिएंट 24.39 km/l मायलेज देते. तसेच CNG व्हेरिएंट 33.85 किमी/किलो पर्यंतचे मायलेज देण्यास सक्षम आहे. या Alto K10 मध्ये 7 इंची फ्लोटिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे.
या गाडीत ऍपल कार प्ले, अँड्रॉइड ऑटो व्यतिरिक्त, ही इन्फोटेनमेंट सिस्टम यूएसबी, ब्लूटूथ आणि ऑक्स केबलला देखील सपोर्ट करत आहे. स्टिअरिंग व्हीललाही नवीन डिझाइन देण्यात आली आहे. यामध्ये स्टीअरिंगवरच इन्फोटेनमेंट सिस्टमचे माउंटेड कंट्रोल देण्यात आले आहे.
या गाडीला इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रिब्युशन (EBD), रिव्हर्स पार्किंग सेन्सरसह अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) देण्यात आली आहे. यासोबतच या गाडीमध्ये प्री-टेन्शनर आणि फोर्स लिमिट फ्रंट सीट बेल्ट सुद्धा आहे. सुरक्षित पार्किंगसाठी रिव्हर्स पार्किंग सेन्सर्ससह ते उपलब्ध आहेत.
कारमध्ये स्पीड सेन्सिंग ऑटो डोअर लॉक आणि हाय स्पीड अलर्टसह इतर अनेक सुरक्षा फीचर्स देखील इनबिल्ट आहेत. ही गाडी विविध प्रकारच्या सहा कलर ऑप्शन मध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. म्हणून ग्राहकांना आपल्या आवडीनुसार कलर सिलेक्ट करता येत आहे.