भारतातील पहिली कूप SUV आता CNG व्हर्जनमध्ये, टाटा करणार लवकरच धमाका!

टाटा कर्व्ह CNG व्हर्जन लवकरच सणासुदीच्या काळात लाँच होणार असून त्याची किंमत सध्याच्या पेट्रोल मॉडेलपेक्षा 1 लाखांनी अधिक असू शकते. या कारच्या इंजिनपासून फीचर्सपर्यंत सविस्तर जाणून घेऊयात.

Published on -

Tata Curvv CNG SUV | टाटा मोटर्सने त्यांच्या बहुप्रतिक्षित Tata Curvv CNG व्हेरिएंटची चाचणी सुरू केली आहे. स्वारगेट (Pune) परिसरात पूर्णपणे छुप्या स्वरूपात ही SUV चाचणी दरम्यान दिसून आली आहे. भारतीय बाजारात पहिली कूप SUV म्हणून ओळखली जाणारी टाटा कर्व्ह आता CNG तंत्रज्ञानासह दाखल होणार असून, आगामी काळात ही कार अधिक पर्यायांसह ग्राहकांसमोर सादर केली जाणार आहे.

सध्या टाटा कर्व्हच्या पेट्रोल, डिझेल, इलेक्ट्रिक आणि आता CNG अशा चार पॉवरट्रेन पर्यायांसह लाँच होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे ही भारतातील पहिली SUV असेल जी iCNG ड्युअल सिलेंडर टेक्नॉलॉजी वापरते. या प्रकारात बूट स्पेसमध्ये अडथळा न आणता सिलेंडरची रचना करण्यात आली आहे, जे याला इतर CNG वाहनांपेक्षा वेगळं बनवतं.

इंजिन आणि किंमत

CNG प्रकाराचे पॉवरट्रेन तपशील अद्याप पूर्णपणे स्पष्ट नाहीत. मात्र, उपलब्ध मीडिया रिपोर्ट्सनुसार, यामध्ये 1.2-लिटर इंजिन दिले जाऊ शकते जे सुमारे 99 BHP ची पॉवर आणि 170 Nm टॉर्क जनरेट करू शकते. ही पॉवरट्रेन त्याच्या सध्याच्या पेट्रोल इंजिनवर आधारित असेल आणि त्यास CNG सुसंगत बनवण्यात आले आहे.

या नवीन CNG प्रकाराची किंमत सध्याच्या पेट्रोल वर्जनपेक्षा अंदाजे 1 लाख अधिक असण्याची शक्यता आहे. याचाच अर्थ, कर्व्ह CNG ची प्रारंभिक किंमत सुमारे 12.5 लाखांपासून सुरू होऊ शकते. टाटा मोटर्स ही SUV दिवाळी किंवा दसऱ्याच्या सणासुदीच्या काळात बाजारात आणू शकते, अशी शक्यता आहे.

या SUV च्या Dark Edition वरही काम सुरू असल्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे कर्व्ह SUV अनेक पर्यायांसह मार्केटमध्ये येणार असून, ती भारतातील SUV सेगमेंटमध्ये एक मोठा गेमचेंजर ठरू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News