7.22 लाखात मिळवा CNG कार! पेट्रोलच्या महागाईपासून सुटका करा, ‘हे’ आहेत 3 सर्वोत्तम पर्याय

जर तुम्ही एक किफायतशीर CNG कार खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुमचे बजेट 10 लाख रुपयांच्या आत असेल तर तुमच्यासाठी काही उत्तम पर्याय उपलब्ध आहेत. सीएनजी कार वापरण्यामुळे पेट्रोलपेक्षा जास्त मायलेज मिळवता येते. त्यामुळे तुमचे खर्च कमी होऊ शकतात.

Ratnakar Ashok Patil
Published:

Low Price CNG Car:- जर तुम्ही एक किफायतशीर CNG कार खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुमचे बजेट 10 लाख रुपयांच्या आत असेल तर तुमच्यासाठी काही उत्तम पर्याय उपलब्ध आहेत. सीएनजी कार वापरण्यामुळे पेट्रोलपेक्षा जास्त मायलेज मिळवता येते. त्यामुळे तुमचे खर्च कमी होऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला अशा काही CNG कारबद्दल माहिती घेणार आहोत ज्यांची किंमत फक्त 7.22 लाख रुपयांपासून सुरू होते. या कारमध्ये तुमचं बजेट, लूक आणि मायलेज सर्व काही तुम्हाला मिळेल.

टाटा पंच CNG

टाटा पंच ही एक मायक्रो एसयूव्ही आहे जी 5 स्टार ग्लोबल एनसीएपी सेफ्टी रेटिंगसह येते. म्हणजेच सुरक्षा आणि डिझाइन दोन्ही बाबतीत ही कार एक उत्तम पर्याय आहे.

टाटा पंचमध्ये 1.2 लीटर (रेव्होट्रॉन इंजिन आहे. जे चांगला पॉवर आणि मायलेज देते. टाटा पंच CNG एक किलो सीएनजीमध्ये 26.99 किलोमीटर पर्यंत धावू शकते.जे पेट्रोलपेक्षा जास्त मायलेज आहे. याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 7,22,900 रुपये आहे. जी तुमच्या बजेटमध्ये सहज बसू शकते.

ह्युंदाई एक्सटर एस CNG

ह्युंदाई एक्सटर ही एक आकर्षक आणि प्रशस्त क्रॉसओव्हर एसयूव्ही आहे. यात 1197 सीसीचे शक्तिशाली इंजिन आहे जे 6000 आरपीएम वर 67.72 बीएचपी पॉवर आणि 4000 आरपीएम वर 95.2 एनएम टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.

मायलेजच्या बाबतीत ही कार खूप किफायतशीर आहे.कारण ती 1 किलो सीएनजीमध्ये 27.1 किलोमीटर धावू शकते. याची एक्स-शोरूम किंमत 8.43 लाख रुपये आहे. जी त्याच्या आकर्षक फीचर्स आणि मायलेजनुसार एक चांगला पर्याय आहे.

ह्युंदाई ग्रँड i10 NIOS CNG

ह्युंदाई ग्रँड i10 NIOS CNG मध्ये 1.2 लिटर पेट्रोल इंजिन आहे.जे सीएनजी मोडमध्ये 68 बीएचपी पॉवर आणि 95 एनएम टॉर्क जनरेट करते. मायलेजच्या बाबतीत ही कार एक किलो सीएनजीमध्ये 25.61 किमी पर्यंत धावू शकते. याची एक्स-शोरूम किंमत 7.72 लाख रुपये आहे, ज्यामुळे ती किफायतशीर आणि दमदार कामगिरी देणारी एक उत्तम सीएनजी कार ठरते.

सीएनजी कार का?

या तीन सीएनजी कार्स तुम्हाला पेट्रोलच्या महागड्या किमतीपासून सुटका मिळवून देतील. टाटा पंच, ह्युंदाई एक्सटर आणि ह्युंदाई ग्रँड आय10 NIOS यामध्ये तुम्हाला किफायतशीर किंमत, उत्कृष्ट मायलेज आणि सुरक्षितता मिळते. त्यामुळे जर तुम्ही सीएनजी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या मॉडेल्समध्ये तुमच्यासाठी उत्तम पर्याय उपलब्ध आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe