360 डिग्री कॅमेरा, मल्टीपल एअरबॅग्ज आणि क्रूझ कंट्रोलसह येणारी Mahindra Scorpio N ₹85,000 ने स्वस्त, ऑफरनंतर किती असेल किंमत?

महिंद्राने एप्रिलमध्ये स्कॉर्पिओ एनवर ₹85,000 पर्यंत सवलत जाहीर केली आहे. ही ऑफर MY2024 मॉडेलवर असून ती 30 एप्रिलपर्यंत वैध असणार आहे. ग्राहकांना या ऑफरचा लाभ घेण्यासाठी काहीच दिवस शिल्लक आहेत.

Published on -

Mahindra Scorpio N | महिंद्रा स्कॉर्पिओ एन ही भारतातील सर्वाधिक लोकप्रिय आणि विक्री होणाऱ्या एसयूव्हींपैकी एक आहे. मजबूत लूक, दमदार इंजिन आणि जबरदस्त वैशिष्ट्यांमुळे ही कार ग्राहकांमध्ये विशेष पसंतीस उतरली आहे. आता एप्रिल 2025 मध्ये या गाडीवर कंपनीने मोठी सूट दिली आहे. महिंद्रा स्कॉर्पिओ एन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना यावेळी ₹85,000 पर्यंत बचत करता येणार आहे. ही ऑफर MY2024 मॉडेल्सवर लागू असून, 30 एप्रिलपर्यंत वैध आहे.

या सवलतीचा लाभ घेण्यासाठी Mahindra च्या अधिकृत डीलरशिपशी संपर्क साधावा लागेल. ही सवलत विविध स्वरूपात मिळू शकते, जसे की कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस, किंवा फाइनान्स ऑफर.

किंमत-

महिंद्रा स्कॉर्पिओ एन ची एक्स-शोरूम किंमत ₹13.99 लाखांपासून सुरू होऊन टॉप व्हेरिएंटसाठी ₹24.89 लाखांपर्यंत जाते. कारमध्ये मिळणारी फीचर्स यादी खूप आकर्षक आहे. यामध्ये 8-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, क्रूझ कंट्रोल, वायरलेस चार्जिंग, 360 डिग्री कॅमेरा, सनरूफ, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि मल्टीपल एअरबॅग्ज यांचा समावेश आहे.

इंजिन-

इंजिन पर्यायातही स्कॉर्पिओ एन भरपूर ताकद दाखवते. यामध्ये 2.0-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे जे 203 bhp पॉवर निर्माण करतं. त्याचबरोबर 2.2-लिटर डिझेल इंजिन पर्यायही उपलब्ध असून ते 175 bhp पॉवर जनरेट करतं. हे इंजिन मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह दिलं जातं.

एकूणच, स्कॉर्पिओ एन खरेदीचा विचार करत असाल तर एप्रिल 2025 मध्ये ही संधी चुकवू नका. ₹85,000 पर्यंतच्या सवलतीसह ही SUV आणण्याची उत्तम वेळ आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News