Maruti Suzuki Upcoming Car : मारुती सुझुकी ही देशातील सर्वाधिक कार विक्री करणारी कंपनी. या कंपनीच्या गाड्या कुठंही सहजतेने नजरेस पडतात. ग्रामीण भाग असो की शहरी भाग सर्वत्र या कंपनीच्या गाड्या तुम्हाला पाहायला मिळतील. दरम्यान आता कंपनी आपला पोर्टफोलिओ आणखी स्ट्रॉंग करणार आहे.
कारण की पुढल्या महिन्यात म्हणजेच सप्टेंबर मध्ये कंपनीची एक नवीन गाडी लाँच होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार मारुती सुझुकी आपल्या एका लोकप्रिय सेडान कारचे फेसलिफ्ट वर्जन लॉन्च करणार आहे.
मारुती सुझुकी डिझायर या लोकप्रिय कारचे फेसलिफ्ट वर्जन पुढल्या महिन्यात बाजारात दाखल होणार आहे. या नवीन फेसलिफ्ट वर्जन मध्ये अनेक मोठमोठे बदल पाहायला मिळू शकतात.
या गाडीचे फेसलिफ्ट मॉडेल अनेकदा चाचणी दरम्यान स्पॉट करण्यात आले आहे. दरम्यान आता आपण या आगामी फेसलिफ्ट डिझायर च्या फीचर्स बाबत आणि किमती बाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसे असतील फिचर्स अन स्पेसिफिकेशन ?
मीडिया रिपोर्ट नुसार फेसलिफ्ट डिझायरमध्ये समोर एक नवीन बोनेट, बंपर आणि हेड लाइट्स उपलब्ध करून दिले जाणार आहे. या कारच्या साईड प्रोफाइलमध्येही तुम्हाला नवीनतम काम पाहायला मिळणार आहे. नवीन डिझायरच्या मागील लूकमध्येही बदल केलेला राहू शकतो.
या गाडीत नवीन बंपर आणि LED टेल लाईट्स देखील मिळू शकतात. यावेळी नवीन Dezire ला नवीन Z-Series तीन सिलिंडर इंजिन मिळेल जे ८२ hp ची पॉवर आणि ११२ Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम राहणार आहे.
नवीन Dezire CNG मध्ये देखील ऑफर केली जाईल, ज्याचे मायलेज ३०km/kg पर्यंत असू शकते असा दावा केला जात आहे. गाडीचे इंजन हे पाच स्पीड मॅन्युअल आणि पाच स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सला जोडलेले असेल. या गाडीचे इंटिरियर देखील मोठ्या प्रमाणात बदलले जाईल.
या गाडीत ६ एअरबॅग्ज, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, फ्रंट-व्हील ड्राइव्ह, ४ पॉवर विंडो सारखे फीचर्स उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या नवीन जनरेशनच्या डिझायर मध्ये ॲडव्हान्स ड्रायव्हिंग असिस्टंट सिस्टम उपलब्ध राहणार आहे.
कधी लाँच होणार नवीन डिझायर
मारुती सुझुकी डिजायर फेसलिफ्ट 15 सप्टेंबरला लॉन्च केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. तथापि कंपनीकडून अजूनही लॉन्चिंग संदर्भात अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. यामुळे 15 सप्टेंबरला ही गाडी खरच लॉन्च होणार का हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
किंमत किती राहणार?
सध्याच्या डिझायरपेक्षा फेसलिफ्ट डिझायर ची किंमत थोडीशी जास्त राहणार आहे. नवीन डिझायरची एक्स शोरूम किंमत ही जवळपास दहा लाखाच्या आसपास राहील असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जातोय. म्हणजेच सध्याच्या डिझायर पेक्षा ही गाडी चार लाखांनी महाग राहणार आहे.