शेतकऱ्यांसाठी सोनेरी संधी! मिनी ट्रॅक्टरवर सरकार देत आहे 50% अनुदान, जाणून घ्या कसं मिळवावं?

आजकाल शेतकऱ्यांच्या हातात असलेली शेतजमीन कमी होत चालली आहे आणि यामुळे त्यांना मोठ्या ट्रॅक्टरचा वापर करणे कठीण होत आहे. अशा परिस्थितीत मिनी ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरू शकते.

Ratnakar Ashok Patil
Published:

Mini Tractor Subsidy:- आजकाल शेतकऱ्यांच्या हातात असलेली शेतजमीन कमी होत चालली आहे आणि यामुळे त्यांना मोठ्या ट्रॅक्टरचा वापर करणे कठीण होत आहे. अशा परिस्थितीत मिनी ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरू शकते.

मोठ्या ट्रॅक्टरची किंमत जास्त असली तरी मिनी ट्रॅक्टर कमी किंमतीत अधिक कार्यक्षम असते.या ट्रॅक्टरमध्ये मोठ्या ट्रॅक्टरप्रमाणे सर्व प्रकारचे काम करण्याची क्षमता आहे आणि शेतकऱ्यांना हे कमी खर्चात अधिक फायद्याचे ठरते.

मिनी ट्रॅक्टरचे अप्रतिम फायदे

मिनी ट्रॅक्टरच्या विविध फायद्यांमध्ये त्याचा कमी तेल खर्च, उच्च उत्पादकता आणि टिकाऊपणा यांचा समावेश आहे. मिनी ट्रॅक्टरचा कमाल वेग 62 किमी प्रतितास असून रिव्हर्स स्पीड 51 किमी प्रतितास आहे.

याची हायड्रोलिक क्षमता 778 किलोपर्यंत आहे.जे शेतकऱ्यांच्या विविध कामांसाठी पुरेशी आहे. कमी जमिन असलेल्या शेतकऱ्यांसाठी हे मिनी ट्रॅक्टर एक उत्तम पर्याय ठरते. कारण ते किफायतशीर असून टिकाऊ असते.

केंद्र सरकार देते 50% अनुदान

तसेच केंद्र सरकारने या मिनी ट्रॅक्टरच्या खरेदीवर ५०% अनुदान दिले आहे. पीएम किसान ट्रॅक्टर योजने अंतर्गत शेतकऱ्यांना मिनी ट्रॅक्टर खरेदीवर मोठं आर्थिक सहाय्य मिळत आहे.

या योजनेचा लाभ घेऊन शेतकरी कमी किमतीत हे अत्याधुनिक ट्रॅक्टर खरेदी करू शकतात. जे त्यांच्यासाठी शेताच्या कामकाजामध्ये मोठे फायदेशीर ठरते.

मिनी ट्रॅक्टरची किंमत

सध्याच्या बाजारात मिनी ट्रॅक्टरच्या किमती ३ लाख रुपयांपर्यंत आहेत.पण सरकारच्या अनुदानामुळे शेतकऱ्यांना त्याची खरेदी सोपी झाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe