बाजारात धमाका करायला येतेय New Renault Duster , ‘असे’ असू शकतील फीचर्स व स्पेसिफिकेशन्स

Ahmednagarlive24 office
Published:

New-Gen Renault Duster: रेनो डस्टर एसयूव्ही जवळपास एक दशक भारतीय बाजारपेठेत राहिली आणि नंतर 2022 मध्ये तिने मार्केटचा निरोप घेतला. सध्या ही फ्रेंच कार निर्माता कंपनी रेनोचे भारतीय पोर्टफोलिओमध्ये क्विड हॅचबॅक,

ट्रायबर एमपीव्ही आणि काइगर सबकॉम्पॅक्ट एसयूव्ही अशी तीन मॉडेल्स आहेत. मात्र, रेनो आता डस्टर ब्रँड नवी जनरेशन लवकरच भारतात आणण्याच्या तयारीत आहे. नुकत्याच आलेल्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, नेक्स्ट जनरेशन डासिया डस्टर 29 नोव्हेंबर 2023 रोजी पोर्तुगालमध्ये पदार्पण करणार आहे. याला रेनो डस्टर म्हणूनही ओळखले जाते. 2025 मध्ये ही कार भारतात लाँच होण्याची शक्यता आहे.

डिझाइन आणि स्टाइलिंग

रिपोर्ट्सनुसार, रेनो नवीन डस्टरचे तीन रो व्हेरियंट सादर करणार आहे, जे डॅसिया बिगस्टर एसयूव्हीवर आधारित असेल. आगामी डस्टरचे डिझाइन आणि स्टायलिंग बिगस्टरप्रमाणेच असण्याची शक्यता आहे. पुढील बाजूस रिडिझाइन केलेले ग्रिल,

स्लीक एलईडी हेडलॅम्प्स, प्रोमिनेंट फेंडर्स आणि नवीन बम्पर असेल व यात इंटिग्रेटेड अॅल्युमिनियम स्किड प्लेट्ससह नवीन बंपर असतील. या एसयूव्हीमध्ये नवीन डिझाईनचा रियर बंपर, त्रिकोणी आकाराचे टेल लॅम्प आणि मागील बाजूस सी-पिलर माउंटेड डोअर हँडल असतील.

इंटीरियर व फीचर्स

नवीन रेनो डस्टरच्या इंटिरिअरमध्ये डिझाइन आणि फीचर्सच्या बाबतीतही बदल पाहायला मिळणार आहेत. लेटेस्ट स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी आणि डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टरमध्ये मोठी आणि हाय माउंट टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम मिळण्याची शक्यता आहे.

एकंदरीत फिट अँड फिनिश अशा या कार मध्ये मटेरियल क्वालिटी सुधारण्याची शक्यता आहे. नेक्स्ट जनरेशन डस्टरमध्ये थोड्या प्रमाणात वाढलेल्या डाइमेंशनमुळे शक्यतो यात अधिक केबिन स्पेस असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

इंजिन ऑप्शन

न्यू जनरेशनची रेनो डस्टर जागतिक स्तरावर 1.0 लीटर टर्बो पेट्रोल, 1.2 लीटर पेट्रोल हायब्रिड आणि 1.3 लीटर टर्बो पेट्रोल इंजिनसह उपलब्ध होण्याची शक्यता आहे, जी अनुक्रमे 120 बीएचपी, 140 बीएचपी आणि 170 बीएचपी पॉवर जनरेट करू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe