Volkswagen Virtus | भारतीय कार बाजार SUV जास्त विक्री होत असली तरी, एका सेडान कारने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. फोक्सवॅगन व्हर्टस ही कार लोकप्रिय SUV मॉडेल्सना विक्रीत मागे टाकत आहे.
फेब्रुवारी 2025 च्या आकडेवारीनुसार, Virtus ने MG Astor, Skoda Kushaq, Honda Elevate आणि VW Taigun यांच्यावर सरशी मिळवली आहे. चला जाणून घेऊया या सेडानच्या फीचर्सबद्दल अधिक माहिती

फेब्रुवारी 2025 मध्ये, फोक्सवॅगन व्हर्टसची विक्री 1,837 युनिट्स इतकी झाली, जी या सेगमेंटमधील अनेक SUVपेक्षा अधिक आहे. तुलना केल्यास,
Honda Elevate – 1,464, Skoda Kushaq – 1,035, MG Astor – 264, आणि VW Taigun – 1,271 युनिट्स इतकी विक्री झाली होती. म्हणजेच, एक सेडान SUV पेक्षा अधिक पसंत केली जात आहे.
Volkswagen Virtus का खास आहे ?
मित्रांनो Volkswagen Virtus ही केवळ स्टायलिश नसून, तिला असंख्य प्रीमियम फीचर्सने लोकांची फेव्हरेट कार बनवली आहे.
ह्या कारमध्ये इलेक्ट्रिक सनरूफ, 10-इंच टचस्क्रीन, व्हेंटिलेटेड सीट्स, वायरलेस चार्जिंग, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर यांसारखी फीचर्स आहेत.
ही सेडान 1.0-लिटर टर्बो (114bhp, 178Nm) आणि 1.5-लिटर टर्बो (148bhp, 250Nm) इंजिन पर्यायात येते.
ट्रान्समिशनमध्ये 6-स्पीड मॅन्युअल, ऑटोमॅटिक आणि 7-स्पीड DSG ची सुविधा आहे.
Volkswagen Virtus ची किंमत किती आहे ?
SUV च्या क्रेझमध्येही Virtus सारख्या सेडानचे वाढते महत्व हे दाखवते की भारतीय खरेदीदार आता परत एकदा स्टायलिश, परफॉर्मन्स-ओरिएंटेड आणि फीचर-लोडेड सेडानकडे वळत आहेत.
व्हर्टसची ऑन-रोड मुंबईतील किंमत ₹13.68 लाख ते ₹22.95 लाख दरम्यान आहे, जी SUV च्या किंमतीत येते, पण आकर्षक परफॉर्मन्ससह.
तांत्रिकदृष्ट्या, भारतात सर्वाधिक विक्री होणारी सेडान Maruti Dzire आहे. मात्र ती एक कॉम्पॅक्ट सेडान आहे. जर आपण मिड-साईझ प्रीमियम सेडान बद्दल बोललो, तर Volkswagen Virtus सध्या सर्वांत पुढे आहे आणि SUV सेगमेंटमध्ये स्पर्धा निर्माण करत आहे.