Skoda Kylaq: 7.89 लाखात मिळवा प्रीमियम एसयुव्हीचा अनुभव! मिळेल आकर्षक इंटिरियर आणि मायलेज

स्कोडा कंपनीने भारतीय बाजारात आपल्या नवीन एसयूव्ही कायलॅकला 27 जानेवारी रोजी अधिकृतपणे लाँच केले आहे. या कारबद्दल अनेक प्रकारची माहिती आधीच समोर आली होती. स्कोडा कायलॅकची एक्स-शोरूम किंमत 7.89 लाखपासून सुरू होते. ज्यामुळे ती एक बजेट फ्रेंडली ऑप्शन ठरते. या कारला अत्याधुनिक सुरक्षा फीचर्स आणि उत्कृष्ट मायलेजसह एक प्रीमियम डिझाइन दिलं आहे.

Ratnakar Ashok Patil
Updated:

Skoda Kylaq Car:- स्कोडा कंपनीने 27 जानेवारी रोजी भारतीय बाजारात आपली नवीन एसयूव्ही स्कोडा कायलॅक अधिकृतपणे लाँच केली. या कारबद्दल आधीच विविध प्रकारच्या माहित्या समोर आल्या होत्या आणि स्कोडा कायलॅकच्या किंमतीसुद्धा खूप आकर्षक ठरल्या आहेत.

या कारची एक्स-शोरूम किंमत 7.89 लाख रुपये पासून सुरू होऊन ती एक बजेट फ्रेंडली ऑप्शन म्हणून ओळखली जात आहे. स्कोडा कायलॅकला एक प्रीमियम डिझाइन आणि अत्याधुनिक सुरक्षा फीचर्स मिळाले आहे.जे त्याला बाजारात इतर एसयूव्हींच्या तुलनेत एक उत्तम पर्याय बनवते.

सुरक्षा फीचर्स

सुरक्षा आणि इंटीरिअर फीचर्समध्ये स्कोडा कायलॅकची उत्कृष्टता सिद्ध झालेली आहे. या कारला भारतीय एनसीएपी क्रॅश टेस्टमध्ये अॅडल्ट आणि चाइल्ड ऑक्युपंट प्रोटेक्शनसाठी फाइव्ह स्टार रेटिंग प्राप्त झाले आहे. याचा अर्थ कायलॅकमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक व्यवस्थापन आहे.

इंटीरिअरमध्ये प्रीमियम फीचर्स दिली आहेत.जसे की डिजिटल डिस्प्ले, पॉवर्ड ड्रायव्हर सीट, लेदरेट अपहोल्स्ट्री, अँबियंट लायटिंग आणि सिक्स स्पीकर साउंड सिस्टीम इत्यादी याशिवाय सर्व व्हॅरिएंट्समध्ये सहा एअरबॅग्ज, ट्रॅक्शन कंट्रोल, आयसोफिक्स चाइल्ड सीट माउंटिंग पॉइंट्स आणि इतर सुरक्षा फीचर्स दिले असून जे सुरक्षा सुनिश्चित करतात.

इंजिन आणि मायलेज

इंजिन आणि मायलेजच्या बाबतीत स्कोडा कायलॅकमध्ये 1.0 लिटर टीएसआय पेट्रोल इंजिन आहे.जे 114 बीएचपी पॉवर आणि 178 एनएम टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 6 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड ऑटोमॅटिक गीअरबॉक्सच्या पर्यायांसोबत उपलब्ध आहे.

मॅन्युअल व्हर्जन 1 लिटर पेट्रोलमध्ये 19.68 किमी प्रति लिटर मायलेज देते. जे इतर एसयूव्हींच्या तुलनेत खूप चांगले आहे. मायलेजच्या दृष्टीने कायलॅक इतर प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत अधिक फायदेशीर ठरते.

मिळालेले सेफ्टी रेटिंग

सुरक्षा टेस्टमध्ये स्कोडा कायलॅकने फाइव्ह स्टार रेटिंग मिळवले आहे. ज्यात चाइल्ड ऑक्युपंट प्रोटेक्शनमध्ये या कारने 49 पैकी 45 गुण मिळवले आहेत. सुरक्षिततेच्या बाबतीत कायलॅकची कामगिरी निश्चितच चांगली आहे.

त्याच्या तुलनेत मारुती सुझुकी ब्रेझा कमी सुरक्षिततेची आहे.ज्याची किंमत 8.34 लाख रुपये पासून सुरू होते. कायलॅकची डिझाइन आणि क्वालिटी ब्रेझाच्या तुलनेत अधिक प्रीमियम आहे.

एकूणच स्कोडा कायलॅक एक उत्कृष्ट ऑप्शन आहे.ज्यामध्ये प्रीमियम डिझाइन, उच्च सुरक्षा आणि चांगला मायलेज फायद्याचे ठरेल.त्याची आकर्षक किंमत आणि उच्च मानकांचे फीचर्स यामुळे ही कार भारतीय बाजारात एक महत्त्वपूर्ण स्थान मिळवू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe