Tata Curvv EV Launch : नवीन कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक गुड न्यूज आहे. Tata Motors ने आज Curvv EV भारतात अधिकृतरित्या लॉन्च केली आहे. खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून या गाडीच्या चर्चा सुरू होत्या. चर्चेचे कारण असे की, ही भारतातील पहिली एसयूव्ही-कूप गाडी आहे. खरंतर एसयुव्ही सेगमेंट मध्ये टाटा कंपनीच्या अनेक गाड्या लोकप्रिय आहेत. दरम्यान आता कंपनीने हा सेगमेंट आणखी स्ट्रॉंग Curvv लाँच केली आहे. विशेष म्हणजे ही गाडी इंटरनल कम्बशन इंजिन म्हणजे ICE आणि EV दोन्ही आवृत्त्यांमध्ये लाँच केली जाणार आहे.
पण आज ही गाडी फक्त इलेक्ट्रिक वर्जन मध्ये लॉन्च झाली आहे. विशेष म्हणजे या गाडीचे ICE मॉडेलचे खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी तुम्हाला सप्टेंबरपर्यंत वाट पहावी लागणार आहे. कारण की ICE मॉडेल सप्टेंबर मध्ये लॉन्च होणार आहे. आता आपण या नवीन इलेक्ट्रिक SUV-कूप Tata Curvv EV च्या फीचर संदर्भात आणि किमतीबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
खरंतर भारतात गेल्या काही वर्षांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढला आहे. विविध कंपन्यांनी इलेक्ट्रिक कार्स बाजारात लॉन्च केल्या आहेत. मात्र, इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये टाटा कंपनीचा खूपच बोलबाला आहे. या सेगमेंटमध्ये भारतात टाटा कंपनीची मक्तेदारी पाहायला मिळते. दरम्यान आता टाटा कंपनीने Curvv EV ही इलेक्ट्रिक कार लॉन्च करून आपला हा इलेक्ट्रिक सेगमेंटचा पोर्टफोलिओ आणखी स्ट्रॉंग बनवला आहे.
कसे आहे कारचे डिझाईन ?
टाटा मोटर्सच्या बाह्य डिझाईनबद्दल बोलायचे झाल्यासं हे डिजाईन खूपच वेगळे आहे. याचे डिझाईन कूप स्टाईल आहे. Curvv ev च्या पुढील बाजूस क्लोज-ऑफ ग्रिल आणि वेलकम आणि गुडबाय ॲनिमेशनसह कनेक्ट केलेले LED DRL दिलेले आहेत. यासोबतच समोरच्या बंपरमध्ये वर्टिकल स्लॅट्स देण्यात आले आहेत. Nexon EV मध्ये देखील असेच बंपर आहे. कर्व्हमध्ये फ्लश-प्रकारचे डोअर हँडल आहेत, जे कंपनीने पहिल्यांदाच वापरले आहे. यात अलॉय व्हील्स आणि एक उतार असलेली छप्पर आहे जी तिचे एसयूव्ही-कूप स्वरूप हायलाइट करत आहे.
इंटेरियर मध्ये काय आहे खास?
Tata Motors च्या नुकत्याच लॉन्च झालेल्या Curvv EV चे इंटीरियर देखील खूपच भन्नाट आहे. यात ड्युअल-टोन डॅशबोर्ड, 4-स्पोक स्टीयरिंग व्हील आणि टच-सक्षम हवामान नियंत्रण पॅनेल सारखें फीचर्स देण्यात आले आहेत. यात पॅनोरामिक सनरूफ, 12.3-इंच फ्री-फ्लोटिंग इन्फोटेनमेंट सिस्टम, 10.25-इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आणि समोर हवेशीर जागा देखील देण्यात आली आहे.
या गाडीमध्ये Nexon प्रमाणे ड्राइव्ह मोड निवडक आणि स्वयंचलित गियर शिफ्टर देण्यात आले आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी, यात सहा एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण (ESC), 360 डिग्री कॅमेरा आणि ॲडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन-कीप असिस्ट आणि फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंगसह ॲडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम (ADAS) सारखी अद्ययावत फीचर्स देखील प्रदान करण्यात आली आहेत.
पॉवरट्रेन कसे राहणार ?
Tata Curvv EV च्या पॉवरट्रेनबाबत बोलायचं झालं तर यात दोन बॅटरी पॅकचा पर्याय देण्यात आला आहे. कंपनीने या कारमध्ये 45 kWh आणि 55 kWh चे बॅटरी पॅक दिलेले आहे. कंपनीने असा दावा केला आहे की, 45 kWh बॅटरी पॅक असणारी कार 502 किलोमीटरची ड्रायव्हिंग रेंज देण्यासं सक्षम राहणार आहे.
तसेच 55 kWh बॅटरी पॅक असणारी कार तब्बल 585 किलोमीटर ची रेंज देण्यास सक्षम असेल. प्रत्यक्षात मात्र 45 kWh बॅटरी पॅक असणारी कार 350 किलोमीटर आणि 55kWh क्षमता असणारी कार 425 किलोमीटर पर्यंतचे रेंज देऊ शकते असे देखील कंपनीने स्पष्ट केले आहे.
किंमत किती राहणार?
Tata Motors ने Curvv EV च्या किमती नुकत्याच जाहीर केले आहेत. कंपनीने Curvv EV ची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 17.49 लाख रुपये एवढी ठेवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 45 kWh बॅटरी पॅक असणारी कार Creative, Accomplished आणि Accomplished +S या वेरियंट मध्ये लॉन्च केली असून याच्या एक्स शोरूम किंमती अनुक्रमे 17.49 लाख, 18.49 लाख आणि 19.29 लाख रुपये अशा आहेत.
तसेच 55 kWh बॅटरी पॅक असणारी कार Accomplished, Accomplished +s, Empowered * आणि Empowered *A वेरियंटमध्ये लॉन्च करण्यात आली असून याच्या एक्स शोरूम किमती अनुक्रमे 19.25 लाख, 19.99 लाख, 21.25 लाख आणि 21.99 लाख रुपये अशा आहेत.