Tata Punch Sales In June : टाटा मोटर्स ही देशातील एक लोकप्रिय ऑटो कंपनी आहे. या कंपनीच्या अनेक गाड्या ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. दरम्यान, कंपनीच्या एका लोकप्रिय गाडीने गेल्या महिन्यात अर्थात जून महिन्यात विक्रीचा एक नवा टप्पा गाठला आहे. टाटा समूहाच्या टाटा मोटर्स या उप कंपनीची टाटा पंच ही गाडी देशातील नंबर एक कार बनली आहे.
या गाडीला ग्राहकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवला आहे. टाटा पंचने मारुती सुझुकीच्या 4th जनरेशन स्विफ्ट कारला मागे टाकले आहे. मे महिन्यात मारुती सुझुकी फोर्थ जनरेशन स्विफ्ट कार देशातील नंबर एक कार बनली होती. मारुती सुझुकी ही देशातील सर्वाधिक कार विक्री करणारी कंपनी आहे.
कंपनीने आपल्या लोकप्रिय मारुती सुझुकी स्विफ्ट या कंपनीचे फोर्थ जनरेशन मॉडेल मे महिन्यातच लॉन्च केले होते आणि लगेच ही गाडी देशातील सर्वाधिक विक्री होणारी कार बनली. मात्र जून महिन्यात टाटा पंचने बाजी मारली आहे. टाटा पंच ही कंपनीची सर्वात जास्त विक्री होणारी कार आहे.
गेल्या महिन्यात तर ही गाडी देशात सर्वात जास्त विक्री होणारी कार बनली आहे. या गाडीचे दमदार इंजिन, आकर्षक लूक आणि दमदार परफॉर्मन्स ग्राहकांच्या पसंतीस खरे उतरले आहेत.
ही SUV गेल्या जून महिन्यात मारुती सुझुकी फोर्थ जनरेशन स्विफ्टला जड भरली आहे.पण, मारुती सुझुकी फोर्थ जनरेशन स्विफ्ट गेल्या महिन्यात देशातील सर्वात जास्त विक्री होणारी हॅचबॅक कार बनली आहे.
तसेच ही फोर्थ जनरेशन स्विफ्ट सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार्सच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर राहिली आहे. दरम्यान, आता आपण जून महिन्यात कोणत्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या टॉप 10 कारची माहिती पाहणार आहोत.
जून महिन्यात सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार कोणत्या
1) टाटा पंच : 18238 युनिट
2) मारुती सुझुकी स्विफ्ट 4th जनरेशन : 16422 युनिट
3) ह्युंदाई क्रेटा : 16293 युनिट
4) मारुती सुझुकी एर्टिगा : 15,902 युनिट
5) मारुती सुझुकी बलेनो : 14,895 युनिट
6) मारुती सुझुकी वॅगनआर : 13,790 युनिट
7) मारुती सुझुकी डिजायर : 13421 युनिट
8) मारुती सुझुकी ब्रेझ्झा : 13,172 युनिट
9) महिंद्रा स्कॉर्पियो : 12 हजार 307 युनिट
10) टाटा नेक्सन : 12 हजार 66 युनिट