क्रेटा, विटाराला मिळणार तगड कॉम्पिटिशन ! टाटाची नवीन एसयूव्ही ‘या’ तारखेला लॉन्च होणार, कसे असणार इंजिन आणि किंमत किती ?

Tejas B Shelar
Published:
Tata Upcoming SUV Car

Tata Upcoming SUV Car : यंदाच्या फेस्टिव सीझनमध्ये म्हणजेच सणासुदीच्या काळात नवीन कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टाटा कंपनी लवकरच एक नवीन एसयुव्ही कार लॉन्च करणार आहे. यामुळे ज्या लोकांना नवीन एसयुव्ही कार खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी आणखी एक नवीन ऑप्शन लवकरच भारतीय बाजारपेठेत पाहायला मिळणार आहे.

गेल्या काही वर्षांचा विचार केला असता आपल्या असे लक्षात येते की, भारतीय ग्राहकांमध्ये आता मध्यम आकाराच्या एसयूव्हीची मागणी वाढत चालली आहे. ऑटो कंपनी देखील SUV ची वाढती मागणी लक्षात घेता नवनवीन एसयुव्ही कार लॉन्च करत आहेत.

सध्या या सेगमेंटमध्ये भारतीय कार मार्केटमध्ये Hyundai Creta, Kia Seltos आणि Maruti Suzuki Grand Vitara सारख्या SUV मार्केट गाजवत आहेत. मात्र आता या गाड्यांना टाटा मोटर्स तगडे आव्हान देणार आहे. कारण की, टाटा मोटर्स या सेगमेंटमध्ये आणखी एक नवीन एसयूव्ही लाँच करणार आहे.

ही गाडी पुढल्या महिन्यात बाजारात येणार आहे. 7 ऑगस्टला भारतीय बाजारपेठेत ही कार लॉन्च केली जाणार अशी माहिती कंपनीकडून समोर आली आहे. आगामी SUV ही Tata Curvv राहणार आहे. ही गाडी सर्वप्रथम इलेक्ट्रिक व्हेरियंटमध्ये लॉन्च केली जाणार आहे.

यानंतर Tata Curvv चे ICE व्हेरियंट लॉन्च केले जाईल. दरम्यान आज आपण या गाडीचे फीचर्स कसे राहणार, या गाडीला कसे पावर ट्रेन मिळणार, याची संभाव्य किंमत किती असेल या संदर्भात थोडक्यात माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कसे राहणार इंजिन ?

मीडिया रिपोर्ट नुसार Tata Curvv ला 1.2-लीटर टर्बो पेट्रोल इंजिन दिले जाणार आहे. जे की जास्तीत जास्त 118bhp पॉवर आणि 170Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम राहणार आहे. याशिवाय, आगामी SUV मध्ये 1.5-लीटर डिझेल इंजिन दिले जाईल जे जास्तीत जास्त 113bhp पॉवर आणि 260Nm चा पीक टॉर्क जनरेट करणार आहे.

दुसरीकडे, Tata Curve ला 1.2-लीटर डायरेक्ट इंजेक्शन पेट्रोल इंजिन दिले जाईल जे जास्तीत जास्त 123bhp पॉवर आणि 225Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम राहील असे बोलले जात आहे.

या SUV मध्ये ग्राहकांना ट्रान्समिशन म्हणून 6-स्पीड मॅन्युअल आणि 7-स्पीड DCT गिअरबॉक्सचा पर्याय मिळणार आहे. असे झाल्यास, टाटा कर्व्ह डिझेल डीसीटी ट्रान्समिशन मिळवणारी पहिली मध्यम आकाराची एसयूव्ही बनणार आहे एवढे नक्कीच.

फिचर्स कसे राहणार ? किंमत किती राहील ?

या गाडीच्या डिझाईन आणि फीचर्स बाबत बोलायचं झालं तर आगामी टाटा कर्वला एलईडी हेडलाइट्स, एलईडी टेललाइट्स आणि एलईडी डीआरएल दिले जाणार आहेत. याशिवाय, फीचर्स म्हणून, आगामी SUV मध्ये पॅनोरॅमिक सनरूफ, लेव्हल-2 ADAS तंत्रज्ञान, 360-डिग्री कॅमेरा, इलेक्ट्रिक टेलगेट, 12.3-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले कनेक्टिव्हिटी, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स दिल्या जाणार आहेत.

या गाडीच्या किमती बाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही पण मीडिया रिपोर्ट्नुसार, टाटा कर्वच्या ICE व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 11 लाख ते 19 लाख रुपयांपर्यंत असणार आहे. म्हणजेच बेस मॉडेलची किंमत 11 लाख आणि टॉप मॉडेलची किंमत 19 लाख राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe