Tata Curvv EV | भारतात इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. कमी चालणाऱ्या खर्चामुळे आणि प्रदूषणमुक्त पर्यायामुळे ग्राहक EV कडे अधिक आकर्षित होत आहेत. अशा वेळी टाटा मोटर्सने आपल्या लोकप्रिय इलेक्ट्रिक SUV Tata Curvv EV वर एप्रिल 2025 मध्ये खास सवलत जाहीर केली आहे. ही सवलत केवळ रोख रकमेपुरती मर्यादित नसून त्यामध्ये एक्सचेंज बोनसचाही समावेश आहे. एकूण मिळणारी सवलत 70,000 पर्यंत असून त्यामुळे या कारची मागणी लक्षणीय वाढण्याची शक्यता आहे.
Tata Curvv EV ची वैशिष्ट्ये
टाटा कर्व्ह EV ही एक प्रीमियम इलेक्ट्रिक SUV असून तिच्या केबिनमध्ये अत्याधुनिक टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे. यात 12.3 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 12.25 इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, 9-स्पीकर JBL साउंड सिस्टिम, पॅनोरॅमिक सनरूफ, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स आणि वायरलेस फोन चार्जर मिळतो. या सर्व वैशिष्ट्यांमुळे कारचा इंटेरिअर खूपच आकर्षक आणि आरामदायक बनतो.

तसेच Tata Curvv EV मध्ये 6 एअरबॅग्स, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC), 360-डिग्री कॅमेरा, फ्रंट आणि रियर पार्किंग सेन्सर्स, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आणि लेव्हल-2 ADAS टेक्नोलॉजी यांसारखी अनेक सुरक्षा वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. त्यामुळे ही कार केवळ आरामदायक नाही, तर प्रवासादरम्यान सुरक्षिततेची हमीही देते.
रेंज आणि बॅटरी पर्याय
टाटा कर्व्ह EV दोन वेगवेगळ्या बॅटरी पॅक्समध्ये उपलब्ध आहे. 45 kWh बॅटरी असलेल्या व्हेरिएंटला एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 502 किमी इतकी रेंज मिळते. दुसऱ्या व्हेरिएंटमध्ये 55 kWh बॅटरी असून ती 585 किमी पर्यंतची नॉनस्टॉप रेंज देण्यास सक्षम आहे. कंपनीचा असा दावा आहे की काही परिस्थितींमध्ये ही रेंज 600 किमीच्या आसपास जाऊ शकते.
किंमत किती?
टाटा कर्व्ह EV भारतात 5 रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. याची एक्स-शोरूम किंमत 17.49 लाखांपासून सुरू होऊन टॉप मॉडेलसाठी 21.99 लाखांपर्यंत जाते. सध्याच्या डिस्काउंटसह ही कार खरेदी करणं अधिक फायदेशीर ठरू शकतं. इच्छुक ग्राहकांनी लवकरच जवळच्या डीलरशी संपर्क करून या ऑफरचा लाभ घ्यावा.