अस्मानी सुलतानी संकटाने शेतीतील बहुतांश पिके संपुष्ठात आली आहेत. खरीप वाया गेला, आता रबीमधील पिके संकटात आहेत. मागील वर्षी अस्मानी संकट होतेच. याचा परिणाम मात्र आता धान्यांच्या किमतीवर होताना दिसत आहे.
ज्वारीच्या धान्याने अगदी रेकॉर्ड मोडले आहे. पंधरा दिवसांपूर्वी ३ हजार २०० ते ४ हजार ८०० रुपये क्विंटल भाव होता. परंतु आज ही जवारी ४ हजार ५०० ते ६ हजार २०० रुपये प्रतिक्विंटल ने विकली जात आहे.

दरम्यान कमी पावसामुळे ज्वारी उत्पादनात घट होण्याची शक्यता होती. परंतु, दोन दिवसापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे ज्वारी पिकांना जीवदान मिळाले. परंतु काही ठिकाणी ज्वारीपिके पूर्णतः झोपली आहेत.
पहा ज्वारीचे दर
अहमदनगर बाजार समितीत ८ नोव्हेंबरला ज्वारीला प्रतिक्विंटल ३ हजार २०० ते ४ हजार ८०० असे बाजार भाव होते. आता या किमती खूप वाढल्या हायेत. आता अहमदनगर बाजार समिती ४५०० ते ६२०० रुपये प्रति क्विंटल दराने ज्वारी विकली गेली.
बाजरीचा भाव किरकोळ फरकासह २ हजार ते ३ हजार प्रति क्विंटल आहे. तुरीला आता सरासरी ९ हजार रुपयांचा भाव मिळत आहे. यात ५०० रुपयांची घट नोंदवली गेली.
एक नजर बाजारभावावर ( ३० नोव्हेंबरची आकडेवारी)
ज्वारी – ४५०० ते ६२०० रुपये
बाजरी – २४०० ते ३१२५ रुपये
तूर – ५२०० ते ९३०० रुपये
हरभरा – ५००० ते ५२५० रुपये
गहू – २००० ते ३००० रुपये