Tur Market Price : तुरीला साडेनऊ हजारांचा भाव, वातावरणाच्या लहरीपणामुळे उत्पन्न घटल्याने शेतकऱ्यांचा खिसा मोकळाच !

Ahmednagarlive24 office
Published:
Tur Market Price

Tur Market Price : बाजारात तुरीचे भाव सध्या तेजीत आहेत. तुरीला संधानकारांक बाजार मिळत आहेत. नऊ ते साडेनऊ हजारांपर्यंत तुरीला बाजार मिळत आहे. परंतु असे भाव वरकरणी जरी दिसत असले तरी मात्र याचा फायदा शेतकऱ्यांना होत नाहीये. याचे कारण म्हणजे भाव जरी वाढले असले तरी, वातावरणाच्या लहरीपणामुळे उत्पन्न खूप कमी झाले आहे.

एकरी सहा, सात क्विंटलपर्यंत उत्पादन निघणे अपेक्षित असताना हे उत्पन्न निम्म्यापेक्षा जास्त घटले आहे. त्यामुळे भाव भेटत जरी असला तरी त्यातुलनेने उत्पन्न कमी निघाले व शेतकऱ्याला वावरे नीट करता करता उत्पन्नापेक्षा डबल पैसा लागू राहिला आहे.

स्मानी संकटासह सुलतानी संकट यंदा सुरवातीला पावसाने हुलकावणी दिल्याने तूर पिकाचे उत्पादन घटले आहे. ढगाळ हवामानामुळे फुलोऱ्यातच तुरीने माना टाकल्याने मोठ्या प्रमाणात उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली. असे असतानाच अवकाळी पावसाने तुरीचे मोठे नुकसान झाले आहे. तुरीच्या डाळीने महागाईचा उच्चांक मोडल्याचे पाहून तूर उत्पादक ‘अच्छे दिन’ आल्याचे स्वप्न रंगवू लागला परंतु, ते अस्मानी व सुलतानी संकटासमोर स्वप्नच राहिले.

भाव आणखी तेजीत येतील

सध्या बाजार समितीमध्ये किरकोळ तुरीची आवक होत आहे. भाव नऊ ते साडेनऊ हजारांपर्यंत मिळत आहे. पण, यावर्षी मात्र पावसाने दडी मारल्याने तुरीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे तुरीचे भाव आणखी वाढतील. पर्यायाने डाळीचे भाव वाढतील. सामान्यांचे बजेट कोलमडेल असे दिसते.

रोगट वातावरण

शेतात उभे असणारे तुरीचे पीक फुलोऱ्यात आले आहे. आता पाण्याची गरज होती परंतु ढगाळ वातावरणामुळे तुरीवर किडींचा प्रादुर्भाव झालाय. किडींचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी शेतकरी विविध औषधांची फवारणी करून अळ्यांवर मारा करत आहेत. असे असतानाच अवकाळी बरसला. त्यामुळे आहे तो फुलोरा गळून जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

तीन एकरात तीन गोण्या

सध्या उत्पन्न घटले आहे. तुरीसोबतच सोयाबीनची देखील अशीच हालत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी दादाभाऊ कदम म्हणतात की, आम्ही साडेतीन एकरात सोयाबीन लावली होती. काढणी, पेरणी इतर खर्च ३० हजरांपर्यंत गेला. उत्पन्न फक्त तीन गोण्या निघाले. आता बाजारभाव जास्त जरी भेटला तरी खर्चाच्या तुलनेत कवडीमोल उत्पन्न निघेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe