शिर्डीत “नक्शा” प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू ड्रोन सर्व्हेक्षणाद्वारे मिळकतींचे अचूक नकाशीकरण, नागरिकांना सहकार्याचे आवाहन

शिर्डी, दि. १ – केंद्र शासनाच्या ‘नक्शा’ प्रकल्पांतर्गत शिर्डी नगरपरिषद हद्दीत ड्रोनद्वारे सर्वेक्षण सुरू असून, प्रत्येक मिळकतीचे नकाशीकरण व माहिती संकलनाचे काम प्रगतीपथावर आहे. नागरिकांनी स्वतःच्या जमिनीचे सातबारा उतारे, खरेदीखत व मिळकत पत्रिका आदी दस्तऐवज सादर करून सहकार्य करावे, असे आवाहन राहाता भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक योगेश थोरात यांनी केले आहे. ‘नक्शा’ प्रकल्प केंद्र शासनाच्या … Read more

शेतकऱ्यांनो! कांद्याच्या वांधा होतोय? तर अशा पद्धतीने लागवड करून योग्य नियोजन करा

जुलै-ऑगस्ट महिन्यात खरीप हंगाम पूर्ण जोरात सुरू असतो. याच काळात अनेक शेतकरी आपल्या शेतात कांदा लागवडीसाठी सज्ज होतात. खरीप हंगामात विशेषतः लाल कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. काही शेतकरी थेट बियाण्यांची पेरणी करतात, तर काहीजण रोपे तयार करून लागवड करतात. भरघोस आणि दर्जेदार कांदा उत्पादनासाठी योग्य वाणांची निवड, वेळेवर लागवड, संतुलित खते, आंतरमशागत आणि … Read more

शेतकऱ्यांच्या आवडीचे तरकारी पीक वांगी; असे करा नियोजन निश्चित मिळेल फायदा

अहिल्यानगर : अनेक शेतकरी नियमितपणे पालेभाज्या, फळभाज्यांचे उत्पादन घेतात. यामध्ये मेथी, शेपू, पालक, कोथिंबीर, टोमॅटो, दोडका, काकडी, वांगी, भोपळा, ढोबळी मिरची, कारले आदींना शेतकरी प्राधान्य देताना दिसतात. मात्र शेतकऱ्यांच्या आवडीचे तरकारी पीक म्हटले की हमखास वांगी, टोमॅटो असे समोर येते. अनेक शेतकरी दोन्ही हंगामात वांगी पिकाचे भरघोस उत्पादन घेऊन चांगले पैसे मिळवितात. मात्र बदलत्या हवामानात … Read more

कडू करल्याने आणली संसारात गोडी शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्याची कमाल; प्रतिवर्षी मिळतेय लाखोंचे उत्पन्न!

अहिल्यानगर: ‘कडू कारले ते तुपात तळले अन साखरेत घोळले तरी ते कडूच’अशी आपल्याकडे म्हण प्रचलित आहे. मात्र याच कडू असलेल्या कारल्याने शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्याच्या संसारात गोडी आणली आहे. गेल्या पाच वर्षांपासून एक एकरावरील कारले लागवडीतून प्रतिवर्षी लाखो रूपये मिळविण्याची कमाल शेवगाव तालुक्यातील सामनगाव येथील प्रगतशील शेतकरी वांढेकर करत आहेत. यामध्ये त्यांना पत्नी व इंजनिअर असलेला … Read more

पावसाअभावी पिकांनी टाकल्या माना : जिल्ह्यात सात लाख हेक्टरवरील खरिपाची पिके धोक्यात; रोगाचा प्रादुर्भाव वाढला

अहिल्यानगर : जिल्ह्यात आतापर्यंत ९४.२ टक्‍क्‍यांवर खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. विविध पिकांच्या ६ लाख ७४ हजार ६८६ हेक्‍टरवर खरीप पेरणी झाली. यामध्ये सर्वाधिक १ लाख ७४ हजार ७२१ हेक्टरवर सोयाबिनची पेरणी झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १४०.४ मिमी पावसाची नोंद झाली. मागील दहा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, ६जून महिन्यात आठ … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाने दडी मारल्यामुळे खरीप पिके धोक्यात, गतवर्षीच्या तुलनेत जिल्ह्यात १९१ मिमी कमी पाऊस

अहिल्यानगर- नगर जिल्ह्यात आतापर्यंत ९४.२ टक्क्यांवर खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. विविध पिकांच्या ६ लाख ७४ हजार ६८६ हेक्टरवर खरीप पेरणी झाली. यामध्ये सर्वाधिक १ लाख ७४ हजार ७२१ हेक्टरवर सोयाबिनची पेरणी झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १४०.४ मिमी पावसाची नोंद झाली. मागील दहा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, जून महिन्यात आठ … Read more

अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीत २०१५ क्विंटल भाजीपाल्याची आवक, जाणून घ्या भाजीपाल्याचे सविस्तर दर?

अहिल्यानगर- नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी विविध भाजीपाल्याची २०१५ क्विंटल आवक झाली होती. यामध्ये सर्वाधिक ३८४ क्विंटल टोमॅटोची आवक झाली होती. यावेळी टोमॅटोला ८०० ते ४००० रुपयांपर्यंत भाव मिळाला. मागील आठ दिवसांपासून टोमॅटोच्या भावात वाढ होत असल्याचे दिसून आले. बटाट्याची ३७१ क्विंटलवर आवक झाली होती. बटाट्याला प्रतिक्विंटल ९०० ते २००० रुपयांपर्यंत भाव मिळाला. वांग्याची … Read more

जमिनीतून सोनं पिकवणारा जादूगार जगवा ; अन्यथा पिझ्झाप्रमाणे भाकरीही ऑनलाईन ऑर्डर करावी लागेल ?

अहिल्यानगर : शेतकरी म्हणजे कष्टाने माळरानात धान्य पिकवून जमिनीतून सोनं पिकवणारा जादूगार! मात्र, त्याची व्यथा व त्याचे कष्ट शेतकऱ्याच्या घरी जन्माला आल्याशिवाय समजत नाहीत. प्रॉपर्टी नव्हे तर जीव गहाण ठेवून केला जाणारा व्यवसाय म्हणजे शेती ! कडाक्याचे ऊन असो वा सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस असो वा ओल्याचिंब धारा. अशावेळीदेखील आपला हा सर्जा राजा शेतात राबत … Read more

सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी दूध उत्पादक संघाची निवडणूक बिनविरोध ;दुधापासून इतर पदार्थ निर्मिती करून दूध संघाला बळकटी देणार : नागवडे

अहिल्यानगर : सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी दूध उत्पादक संघाच्या माध्यमातून दुधापासून इतर पदार्थांची निर्मिती करून दूध संघाला बळकटी देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे संघाचे मार्गदर्शक संचालक व सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांनी जाहीर केले. राजेंद्र नागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी दूध उत्पादक संघाच्या सन २०२५ ते … Read more

टोमॅटो उत्पादक शेतकरी ‘लालेलाल’; शेतकऱ्यांच्या परिश्रमाचे मोल मिळाले

अहिल्यानगर : टोमॅटोच्या भावात मात्र चांगलीच वाढ झाल्याचे दिसून आले आहे सध्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांना शेतात उभा शेतमाल विक्रीसाठी बाजारात आणणे शक्य होत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मालाचे नुकसान देखील होत आहे. मात्र खूप कालावधीनंतर शेतकऱ्यांना समानाधारक भाव मिळाला आहे . नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी विविध भाजीपाल्याची २३५३ … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाचा खंड, श्रावणातही पावसाने फिरवली पाठ, शेतकरी दुबार पेरणीच्या चिंतेत

अहिल्यानगर- श्रावण महिन्याच्या सुरुवातीलाच जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या असल्या, तरी पावसाचे प्रमाण अपेक्षेपेक्षा खूपच कमी राहिले आहे. २५ जुलैपर्यंत जिल्ह्यात सरासरी १८६.८ मिमी पावसाची नोंद अपेक्षित असताना प्रत्यक्षात केवळ १२४.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे सुमारे ६२ मिमी इतकी तूट निर्माण झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेतही यंदा कमी पाऊस गेल्या वर्षी श्रावण … Read more

अहिल्यानगरच्या शेतकऱ्यांना हिमाचलच्या सफरचंदाची भुरळ

अहिल्यानगर : जिल्ह्यातील दक्षिण भाग हा दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातो. येथील शेतीला शाश्वत पाण्याचा स्त्रोत उपलब्ध नसल्याने शेती संपूर्णतः निसर्गाच्या भरवशावर अवलंबून आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा नेहमीच शेतकऱ्यांना फटका बसत असतो. अपवादात्मक स्थिती वगळता शेती व्यवसाय तोट्यातच जात असल्याचे चित्र तालुक्यात पहावयास मिळते. यावर पर्याय म्हणून आधुनिकतेची कास धरतअनेक तरुण शेतकरी शेतीत नवनवीन प्रयोग करत … Read more

धरलं तर चावतय… अन् सोडलं तर पळतय….! भाव कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था

अहिल्यानगर : शेतकऱ्यांवर आसमानी संकट कोसळले आहे. पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम धोक्यात आला असून कांद्याचे भाव गडगडल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली आहे. कांद्याची वखारी मध्ये साठवणूक करावी तर कांदा खराब होतोय विकावा तर भावाअभावी झालेला खर्च देखील वसूल होत नाही अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. बळीराजावर सर्वच बाजूंनी संकटाचे ढग दाटलेअसून … Read more

अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात २६० क्विंटल फळांची आवक, डाळिंबांना प्रतिक्विंटल १४ हजार रुपयांपर्यंत भाव

अहिल्यानगर- अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात सोमवारी २६० क्विंटल विविध फळांची आवक झाली होती. यामध्ये डाळिंबाची सर्वाधिक ६१ क्विंटल आवक झाली होती. डाळिंबांना प्रतिक्विंटल १००० ते १४ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. मोसंबीची ३१ क्विंटल आवक झाली होती. मोसंबीला प्रतिक्विंटल १००० ते ४००० रुपये भाव मिळाला. संत्र्यांची अडीच क्विंटल आवक झाली होती. संत्र्यांना प्रतिक्विंटल … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात ९३.९८ टक्क्यांवर खरिपाच्या पेरण्या पूर्ण, मात्र पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी चिंतेत

अहिल्यानगर- नगर जिल्ह्यात आतापर्यंत ९३.९८ टक्क्यांवर खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. विविध पिकांच्या ६ लाख ५० हजार ९८८ हेक्टरवर खरीप पेरणी झाली. यामध्ये सर्वाधिक १ लाख ७० हजार ६३१ हेक्टरवर सोयाबिनची पेरणी झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ११३.६ मिमी पावसाची नोंद झाली. मागील आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात खरीप पिकांचे … Read more

शेतकऱ्यांनो! सोयाबीन पिकावर हुमणी अळ्यांच्या प्रादुर्भाव दिसतोय, तर ताबडतोब ‘या’ दोन गोष्टी करा अन् अळीचा कायमचा बंदोबस्त मिटवा

राहाता- राहाता तालुक्यामध्ये सोयाबीन पिकाची विस्तृत क्षेत्रावर पेरणी झाली असून सध्या या पिकामध्ये मोठ्या प्रमाणावर हुमणी अळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्वर आणि तालुका कृषी अधिकारी राहाता यांच्यावतीने तालुक्यातील दुर्गापूर, हासनापूर, रामपूरवाडी, एलमवाडी, नपावाडी या गावांमध्ये सोयाबीन प्लॉटला भेटी दिल्या असता सोयाबीनच्या पिकाची मुळे कुरतडून खाल्ल्यामुळे पीक वाळून जात असल्याचे तालुका कृषी … Read more

शेतकऱ्यांनो पीक विमा भरला नसेल तर तात्काळ भरून घ्या, ‘ही’ तारीख असणार आहे आता शेवटची संधी

शिर्डी- राहाता तालुक्यातील शेतकऱ्यांनी ३१ जुलैपूर्वी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होऊन आपले पीक सुरक्षित करावे असे आवाहन तहसीलदार अमोल मोरे व तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे यांनी केले आहे. राहाता तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन, मका, कापूस, बाजरी, भुईमूग आदी पिकांची पेरणी झाली आहे. नैसर्गिक आपत्ती व रोगराईपासून शेतकऱ्यांचे संरक्षण व्हावे यासाठी केंद्र आणि … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातीाल कांदा उत्पादक शेतकरी सापडला दुहेरी संकटात, कांद्याचा भाव वाढत नसल्यामुळे चाळीतच सडायला लागलाय कांदा

कांद्याच्या उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पदरी यंदा फक्त नुकसानच आले आहे. चांगल्या भावाच्या अपेक्षेने चाळीत साठवलेला कांदा सडत चालला आहे आणि बाजारात दर कोसळले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी सरकारकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. उत्पादनासाठी केलेला खर्चही वसूल होणार नाही, या भीतीने शेतकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी एकरी ५० ते … Read more