अहिल्यानगर जिल्ह्यात ८८ टक्क्यांवर खरिपाच्या पेरण्या, तर सर्वाधिक १ लाख ६३ हजार ९८४ हेक्टरवर सोयाबिनची पेरणी

अहिल्यानगर- नगर जिल्ह्यात आतापर्यंत ८८.२२ टक्क्यांवर खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. विविध पिकांच्या ६ लाख ३१ हजार ८२८ हेक्टरवर खरीप पेरणी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक १ लाख ६३ हजार ९८४ हेक्टरवर सोयाबिनची पेरणी करण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ११०.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यातील विविध भागात कमीअधिक प्रमाणात पाऊस होत असल्याने … Read more

कष्टाने पिकवलेला भाजीपाला… शेवटी रस्त्यावर ! पाथर्डीतील शेतकऱ्यांची व्यथा

पाथर्डीच्या भाजी बाजारात सध्या एक वेगळंच चित्र दिसत आहे. शेतकऱ्यांनी मेहनतीने पिकवलेल्या पालेभाज्या बाजारात आणल्या, पण त्या विकायला ग्राहकच नाहीत. कष्टाने उगवलेली मेथी, शेपू, कोथिंबीर यांना आता कवडीमोल भाव मिळतोय, आणि तरीही कोणी घ्यायला तयार नाही. शेवटी हताश होऊन शेतकऱ्यांना आपला माल रस्त्यावर भटकणाऱ्या जनावरांसमोर टाकावा लागतोय. ही परिस्थिती पाहून कोणाच्याही मनाला चटका लागेल. पाथर्डीत … Read more

शेतकऱ्यांनो! जमिनीतून भरघोस असं उत्पादन घ्यायचंय, तर जमिनीचं आरोग्य जपण्यासाठी ‘या’ सोप्या गोष्टी नक्की करा

रासायनिक खते व किटकनाशकांच्या अतिरेकी वापरामुळे जमीन नापीक होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्याचबरोबर विषमुक्त अन्नासाठी खते व किटकनाशकांचा पिकांवरील खर्च कमी करणे आवश्यक आहे. खतांच्या भरमसाठ वापरामुळे जमिनीचे आरोग्य बिघडत असून यासाठी माती परीक्षण करून जमिनीतील सुक्ष्म घटकांचा अभ्यास करून शेती करणे गरजेचे आहे. रासायनिक खतांच्या वापरामुळे शेती क्षारपाड व नापीक होत आहे. आवश्यकता … Read more

कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीला विकास निधी कमू पडू देणार नाही, सभापती राम शिंदेची ग्वाही

मिरजगाव- कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचा लोकाभिमुख कारभार सुरू असून, तेथे शेतकऱ्यांसाठी आवश्यक त्या सुविधा देण्यासाठी विकास निधी कमी पडू दिला जाणार नाही. शेतमालाला योग्य भाव मिळून शेती व शेतकरी समृद्ध व्हावा, हाच या मागचा उद्देश आहे, असे प्रतिपादन विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले. मुंबई येथे कर्जत तालुका बाजार समितीचे सभापती काकासाहेब … Read more

कांद्याच्या दरात अपेक्षित वाढ न झाल्याने अहिल्यानगरमधील शेतकरी अडचणीत

अहिल्यानगर जिल्हा राज्यातील महत्त्वाचा कांदा उत्पादक भाग मानला जातो. येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन होते. मात्र, २०२५ च्या पहिल्या सहामाहीत कांद्याच्या दरात फारशी वाढ न झाल्याने शेतकऱ्यांचे अर्थचक्र कोलमडले आहे. परिणामी, कांदा थेट बाजारात विकण्याऐवजी चाळीत साठवण्याचा पर्याय अनेक शेतकरी निवडत आहेत. डिसेंबर २०२४ मध्ये कांद्याच्या दराने चार हजार रुपये प्रतिक्विंटलचा टप्पा गाठला होता. … Read more

अहिल्यानगर बाजारात कांद्याचे भाव कोसळले ! शेतकऱ्यांना फटका जाणून घ्या बाजारभाव

अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती कांदा मार्केटमध्ये शनिवारी २६ हजार १५३ क्विंटल गावरान लाल कांद्याची आवक झाली होती. शनिवारी झालेल्या लिलावात एक नंबर गावरान कांद्याला प्रतिक्विंटल १३०० ते १७५० रुपये भाव मिळाला. अहिल्यानगर बाजार समितीत दोन नंबर कांद्याला प्रतिक्विंटल ९०० ते १३०० रुपये भाव मिळाला. तीन नंबर कांद्याला प्रतिक्विंटल ५०० ते ९०० रुपये भाव … Read more

Ahilyanagar market : डाळिंबाचे दर गगनाला भिडले! बाजारात मिळतोय तब्बल १८ हजारांचा दर!

Ahilyanagar market : अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात शनिवारी ३५४ क्विंटल विविध फळांची आवक झाली होती. यामध्ये डाळिंबाची ३६ क्विंटल आवक झाली होती. यावेळी डाळिंबांना प्रतिक्विंटल १००० ते १८ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. दरम्यान, कालच्या तुलनेत डाळिंबांच्या भावात १ हजारांनी वाढ झाली आहे. मोसंबीची ५ क्विंटल आवक झाली होती. मोसंबीला प्रतिक्विंटल १००० ते … Read more

डाळींबाच्या भावात झाली मोठी वाढ, अहिल्यानगरच्या मार्केट यार्डात प्रतिक्विंटल मिळतोय एवढे रूपये भाव?

अहिल्यानगर- अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात गुरुवारी ३१३ क्विंटल विविध फळांची आवक झाली होती. यामध्ये डाळिंबाची ४८ क्विंटल आवक झाली होती. यावेळी डाळिंबांना प्रतिक्विंटल १००० ते १७ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. मोसंबीची ३९ क्विंटल आवक झाली होती. मोसंबीला प्रतिक्विंटल १००० ते ४५०० रुपये भाव मिळाला. अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात गुरुवारी … Read more

अहिल्यानगर बाजार समितीत कांद्याच्या दरात पुन्हा घसरण, गुरूवारच्या बाजारात प्रतिक्विंटल मिळाला ‘एवढे’ रूपये भाव

Ahilyanagar onion market : अहिल्यानगर बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात गुरुवारी कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली. यावेळी ३४ हजार ११२ क्विंटल गावरान कांद्याची आवक नोंदवली गेली. कांद्याच्या भावात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असून, बाजारातील मागणी आणि पुरवठ्याच्या समतोलामुळे भावात सुधारणा दिसून आली. नेप्ती उपबाजारात गुरुवारी ३४ हजार ११२ क्विंटल गावरान कांद्याची आवक झाली. ही … Read more

खरीप अन् रब्बी हंगामातही सुर्यफुल लागवड करून कमवू शकता लाखो रूपये? जाणून घ्या लागवडीपासून ते काढणीपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया

दिवसेंदिवस खाद्य तेलाच्या भावात कमालीची वाढ होत आहे. मात्र, त्या तुलतेन तेलबियांचे उत्पादन होताना दिसत नाही. जिल्ह्यात गेल्या काही वर्षात तेलबियांमध्ये महत्त्वाचे असलेल्या सूर्यफूल पेरणी क्षेत्र कमी होत आहे. मात्र, त्याचे योग्य नियोजन केल्यास चांगले उत्पादन मिळते. त्याला भावही चांगला मिळतो. त्यामध्ये आंतरपीकही घेता येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप, रब्बी हंगामात घेण्यात येणाऱ्या पिकाचा विचार करण्यास … Read more

अहिल्यानगर बाजारात समितीत भाजीपाल्याचे भाव कडाडले, जाणून घ्या आजचे भाजीपाल्याचे दर?

अहिल्यानगर- नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी विविध भाजीपाल्याची १७०६ क्विंटल आवक झाली होती. यामध्ये सर्वाधिक ४६५ क्विंटल बटाट्याची आवक झाली होती. यावेळी बटाट्याला १५०० ते २४०० रुपये भाव मिळाला. यावेळी टोमॅटोची ४०५ क्विंटल आवक झाली होती. यावेळी टोमॅटोला प्रतिक्विंटल ५०० ते २००० रुपये भाव मिळाला. वांग्याची २० क्विंटल आवक झाली होती. यावेळी वांग्यांना ५००० … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात पुन्हा पावसाला सुरूवात, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण तर दुबार पेरणीचे संकट टळले

अहिल्यानगर- पुणतांबा परिसरात वरुण राजाने रविवारी व सोमवारी कृपादृष्टी केल्यामुळे सोयाबीन, मका, कपाशी, तूर या पिकांना जीवदान मिळालेले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण आहे. पुणतांबा परिसरातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व ओलाव्याच्या आधारे सोयाबीन, तूर, मका, कपाशी यासारख्या खरीप पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केलेली होती. या पिकांची उगवण चांगली झालेली होती. मात्र, काही दिवसापासून पावसाने उघडीप … Read more

अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीत २६२ क्विंटल फळांची आवक, मागणी वाढल्यामुळे भावात वाढ

अहिल्यानगर- येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात रविवारी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर फळांच्या आवक आणि व्यापारात विशेष उत्साह दिसून आला. या बाजारात विविध फळांचा पुरवठा आणि त्यांना मिळालेले भाव यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले. या दिवशी एकूण २६२ क्विंटल फळांची आवक झाली, ज्यामध्ये डाळिंब, सफरचंद आणि मोसंबी यांचा समावेश होता. मार्केट यार्डात डाळिंबाची … Read more

दुबार पेरणीचे संकट ! पाऊस लांबल्याने शेतकरी अडचणीत,आर्थिक गणितं कोलमडली

ढोरजळगाव परिसरात चालूवर्षी मे महिन्यात अवकाळी पाऊस झाल्याने यंदा पावसाचे प्रमाण चांगले राहील, या आशेने काही शेतकऱ्यांनी अवकाळी पावसावर तर काही शेतकऱ्यांनी मान्सूनच्या पावसावर कपाशी, तूर, मूग, सोयाबीनची पेरणी केली खरी ; परंतु गेल्या महिनाभरापासून पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकरी मोठ्या आडचणीत सापडला असून, त्याच्यापुढे दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. भारत हा कृषिप्रधान देश म्हणून … Read more

अहिल्यानगर बाजार समितीत डाळिंबांना १६ हजारांपर्यंत भाव

अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात शनिवारी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विविध फळांची २७० क्विंटल आवक झाली होती. यावेळी डाळिंबांना प्रतिक्विंटल १ हजार ते १६ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. सफरचंदाची आडीच क्विंटलवर आवक झाली होती. सफरचंदाला प्रतिक्विंटल १० हजार ते २४ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी डाळिंबांची ५६ क्विंटल आवक … Read more

अहिल्यानगर मध्ये कांद्याला मिळाला १९०० रुपयांचा भाव !

Ahilyanagar News : अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबजारात शनिवारी २६ हजार ९६३ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. यावेळी लिलाव पद्धतीने झालेल्या एक नंबर गावरान कांद्याला प्रतिक्विंटल १९०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. मागील आठ दिवसांच्या तुलनेत कांद्याच्या भावात शंभर रुपयांनी वाढ झाल्याचे दिसून आले. अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती कांदा मार्केटमध्ये शनिवारी ४९ हजार … Read more

अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीत आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर फळांची मोठी आवक, जाणून घ्या फळांचा आजचा बाजारभाव?

अहिल्यानगर- अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात शुक्रवारी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर फळांच्या बाजारात तेजी दिसून आली. बाजार समितीत एकूण ३२८ क्विंटल विविध फळांची आवक झाली होती. यावेळी डाळिंबांना प्रतिक्विंटल १ हजार ते १६ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. सफरचंदाला प्रतिक्विंटल २३ हजार ५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी, ४ जुलै रोजी … Read more

अहिल्यानगरच्या भाजीपाला बाजारात गवारीला १२ हजार तर शेवग्याला १० हजारांचा भाव, जाणून घ्या आजचे बाजारभाव?

अहिल्यानगर- नगर बाजार समितीत शुक्रवारी विविध भाजीपाल्यांची २१९४ क्विंटल आवक झाली होती. टोमॅटोची ४३७ क्विंटल आवक झाली होती. यामध्ये मेथी, पालक, शेपू, कोथिंबीरच्या २२ हजार ७१७ जुड्यांची आवक झाली होती. ५ ते १२ रुपयांपर्यंत भाव मिळाला. यावेळी टोमॅटोला प्रतिक्विंटल ४०० ते १८०० रुपये भाव मिळाला. वांग्यांची २१ क्विंटल आवक झाली होती. वांग्यांना प्रतिक्विंटल ३००० ते … Read more