शिक्षकांच्या भरतीबाबत एक मोठी अपडेट आता समोर आली आहे. त्यात सुमारे 69 हजार प्राथमिक सहाय्यक शिक्षकांच्या भरतीमध्ये निवड झालेल्या शिक्षकांना घरी बसावे लागणार आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ही भरती प्रक्रियाच आता थांबविण्यात आली आहे. 2018 नंतर शैक्षणिक आर्हता प्राप्त केलेल्या 69,000 शिक्षकांच्या सेवा संपुष्टात आली आहे.
नेमके काय आहे प्रकरण
हे प्रकरण अलाहाबाद उच्च न्यायालयातील आहे. त्यांच्या आदेशानुसार 2018 नंतर शैक्षणिक पात्रता प्राप्त केलेल्या 69,000 प्राथमिक सहाय्यक शिक्षकांच्या भरतीमध्ये निवड झालेल्या शिक्षकांच्या सेवा संपुष्टात आणण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिक्षण परिषदेचे सचिव सुरेंद्र कुमार तिवारी यांनी याप्रकरणी सर्व शिक्षण अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. शिक्षकांची निवड ही निर्धारित तारखेनंतर केली जाणार नाही, असा आदेश होता. परंतु अनेक शिक्षकांनी मुदतीनंतर अर्ज केले होते. शिक्षक भरतीसाठी 2018 पर्यंत अर्ज केले जात होते, परंतु त्यानंतरही उमेदवारांची निवड करण्यात आली होती.

अधिकाऱ्यांवरही कारवाई होणार
या शिक्षक भरती निवड प्रक्रियेत दोषी असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरही कारवाई केली जाणार आहे. दोषी असलेल्या अधिकाऱ्यांची नावे, कर्मचारी निवड समितीचे सदस्य आणि निवडीसाठी काम करणाऱ्या सर्व बीएसएच्या कार्यकाळाचा तपशील मागवण्याचे स्पष्ट निर्देश सचिवांनी दिले आहेत.
कशी झाली होती भरती
ही भरती तीन टप्प्यांत केली गेली होती. पहिल्या भरतीत 31,277 शिक्षक, दुसरी भरती ऑक्टोबर आणि डिसेंबर 2020 मध्ये तर तिसऱ्या भरतीत 6696 शिक्षकांची निवड करण्यात आली होती. हे सर्व शिक्षक जवळपास 5 वर्षे शिक्षक म्हणून काम करत होते. याआधीही सचिवांनी राज्यातील 29 जिल्ह्यांच्या बीएसएला या प्रकरणाबाबत पत्र दिले होते. आता न्यायालयाच्या आदेशानंतर 9 तारखेला सर्व बीएसएना कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.