ज्या दिवशी व्यक्तीचा जन्म झाला, तो दिवस त्या व्यक्तीसाठी खूप खास असतो. जन्मतारीख मोजून तुम्ही तुमचा मुलांक काढू शकता व त्याच मुलांकावरुन तुम्ही तुमचे भविष्य, वर्तमान, गुण आणि स्वभावाशी संबंधित अनेक गोष्टी शोधू शकता. अंकशास्त्रात हे सर्व जन्मतारखेच्या आधारे शोधता येते. आज आम्ही तुम्हाला अशा लोकांची वैशिष्ट्ये सांगणार आहोत ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16 आणि 25 तारखेला होतो. अशा लोकांचा मुलांक 7 आहे.
मुलांक 7 चे सकारात्मक गूण
अंकशास्त्रात केतूला मूलांक 7 चा स्वामी म्हटले जाते. या संख्येखाली जन्मलेले लोक आध्यात्मिक असतात. अशा लोकांचे आध्यात्मिक विषयांवर खूप खोलवर विचार असतात. या क्रमांकाच्या लोकांमध्ये इतरांना ओळखण्याची चांगली क्षमता असते. हे लोक इतरांना खूप लवकर ओळखतात.

मुलांक 7 चे नकारात्मक गूण
ज्यांचा मुलांक 7आहे, ते लोक खूप चांगले संशोधक असतात. परंतु त्यांची हीच सवय कधीकधी त्यांच्यासाठी खूप समस्या निर्माण करते. खरं तर जास्त संशोधनामुळे ते लवकर निराश होतात. या मुलांकाचे लोक त्यांच्या कुटुंबाशी जास्त संपर्क साधू शकत नाहीत. त्यांचे लोकांशी फारसे चांगले जमत नाही. ते लोकांमध्ये जास्त मिसळत नाहीत.
मुलांक 7 साठी उपाय काय?
ज्यांचा मुलांक 7 आहे त्या लोकांनाी दररोज ध्यान करण्याचा सल्ला दिला जातो. ध्यान केल्याने त्यांच्या मनातील वाईट विचार निघून जातात. याशिवाय आध्यात्मिक, साहित्याशी संबंधित पुस्तके वाचणे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरते. लोकांमध्ये मिसळून राहिले तर हे लोक आनंदी राहतात.
कसा असतो मुलांक 7?
7 मुलांक असलेल्या लोकांचे 4, 13, 22 आणि 31 तारखेला जन्मलेल्या लोकांशी सर्वात चांगले संबंध असतात. 7 मुलांकाचे लोक 9 क्रमांकाच्या लोकांशी जुळवून घेत नाहीत. 9 क्रमांक मंगळाचा आहे आणि 7 क्रमांक केतूचा आहे. केतू आणि मंगळ यांच्यात प्रतिकूल संबंध असल्याने यांचे एकमेकांशी जमत नाही.