‘या’ तारखेला जन्मलेल्या मुलींसोबत लग्न करणाऱ्याच नशीब रातोरात बदलणार ! पैसा, प्रसिद्धी सारं काही मिळणार

Published on -

Mulank : आज पासून दीपोत्सवाला सुरुवात झालीये. लवकरच तुळशी विवाह देखील संपन्न होणार आहे. 2 नोव्हेंबर रोजी तुळशी विवाह संपन्न होईल आणि त्यानंतर लग्नाचा सीजन सुरु होणार आहे. लग्नाच्या सीजनमध्ये अनेकजण लग्न बंधनात अडकणार आहेत. दरम्यान आज आपण अशा 12 तारखांना जन्मलेल्या मुलींची माहिती पाहणार आहोत ज्या की लग्नानंतर आपल्या पतीच्या आयुष्याला एक नवीन दिशा दाखवतात.

या मुली प्रचंड भाग्यशाली असतात आणि लग्नानंतर त्यांच्या पतीला नवीन जीवन मिळते. खरंतर अंकशास्त्र हा वैदिक ज्योतिष शास्त्राचा एक महत्त्वाचा भाग आहे. अंकशास्त्रात अंकांना विशेष महत्त्व असते. मूलांक, भाग्यांक, नामांक अशा अंकांवरून व्यक्तीचे भूत भविष्य आणि वर्तमान काळ ओळखता येते.

दरम्यान ज्या लोकांचा मुलांक भाग्यांक, नामांक सारखा असतो अशा लोकांमध्ये काही गोष्टी कॉमन असतात. अंकशास्त्रानुसार मुलांक हा व्यक्तीच्या जन्मतारखेवरून निघत असतो व तो सिंगल डिजिट असतो.

एक ते नऊ यापैकी कोणताही एक अंक मुळांक असतो. व्यक्तीच्या जन्मतारखेची बेरीज करून मुळांक निघत असतो. कोणत्याही महिन्याच्या दोन तारखेला जन्मलेल्या लोकांचा मुलांक 2 असतो. दरम्यान आज आपण चार मुलांकाच्या मुलीं बाबत माहिती पाहणार आहोत.

मुलांक 9 – कोणत्याही महिन्याच्या नऊ अठरा आणि 28 या तारखांना जन्मलेल्या लोकांचा मुलांक 9 असतो. या मुलांकाचा स्वामी ग्रह मंगळ असतो. हा मुलांच्या मुलींचा असतो त्या मुली कोणालाच घाबरत नाहीत. साहसी असतात, दृढनिश्चयी असतात.

या मुली उत्तम लाईफ पार्टनर बनतात. कोणत्याही संकटात आपल्या कुटुंबाच्या पाठीशी उभ्या राहतात आणि संकटातून बाहेर काढतात. संघर्षाला विजयामध्ये परिवर्तित करण्याची एक अद्भुत कला या मुलींमध्ये पाहायला मिळते.

मुलांक 6 – 6, 15 आणि 24 या तारखांना जन्मलेल्या लोकांचा मुलांक सहा असतो. या लोकांचा स्वामीग्रह शुक्र असतो. या लोकांवर माता लक्ष्मीची विशेष कृपा असते. हा मुलांक असणाऱ्या मुली खूपच भाग्यवान असतात. प्रचंड मेहनती, बुद्धिवान आणि इतरांना आकर्षित करण्याची जादू या मुलींमध्ये असते.

या मुली ज्यांच्या सोबत लग्न करतात त्याचे संपूर्ण आयुष्य बदलते. त्याला पैशांची कधीच कमतरता भासत नाही. या मुली प्रचंड रोमँटिक असतात आणि आपल्या लाइफ पार्टनरला जिवापाड जपतात.

मुलांक 4 – चार 13 आणि 22 या तारखांना जन्मलेल्या मुलींचा मुलांक चार असतो. या मुली लग्नानंतर आपल्या पतीच्या आयुष्यात आर्थिक स्थिरता आणण्याचे काम करतात आणि प्रगतीचे दरवाजे उघडे करतात. कसाही वाईट काळ असू द्या या मुली आपल्या परिवारासमवेत असतात. कोणत्याही समस्येवर मात करण्याची क्षमता यांच्यात असते. प्रॅक्टिकल आणि तल्लख बुद्धी यामुळे या मुली इतरांपेक्षा वेगळ्या असतात.

मुलांक 1 – एक, दहा, एकोणावीस किंवा 28 या तारखेला जन्मलेल्या मुली या मुलांकात येतात. या मुलींचा आत्मविश्वास फारच खास असतो. या मुलींचा स्वामीग्रह सूर्य असतो. यामुळे यशस्वीरीत्या आपल्या करिअरला शेप देतात. सोबतच आपल्या पतीला देखील परिपूर्ण साथ देतात.

लग्नानंतर या मुली त्यांच्या पतीच्या आयुष्यात आर्थिक स्थिरता, प्रगती घेऊन येतात. सोबतच त्या त्यांच्या पतीला आयुष्यात प्रगती करण्यासाठी प्रेरित करतात. पावलोपावली त्यांची साथ देत असतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe