Shukra Gochar 2025 | 13 एप्रिल, चैत्र पौर्णिमा संपल्यानंतर राक्षसांचा गुरु शुक्र (Shukra) आपली दिशा बदलून थेट मार्गी होणार आहे. सध्या तो मीन (Pisces) राशीत वक्री स्थितीत आहे, पण काही दिवसांतच थेट होईल. शुक्र ग्रह विलास, संपत्ती, प्रेम, कला आणि ऐहिक सुखांचा कारक मानला जातो. त्याच्या या परिवर्तनाचा परिणाम सर्व 12 राशींवर होईल, पण विशेषतः 5 राशींसाठी हा काळ अत्यंत शुभदायक ठरणार आहे. त्यांच्या जीवनात यशाचे दरवाजे उघडतील, उत्पन्नात वाढ होईल आणि अनेक नवीन संधी चालून येतील.
शुक्र जेव्हा थेट मार्गी होतो तेव्हा त्याचा प्रभाव फक्त ऐहिक गोष्टींवरच नाही तर मानसिक समाधान, सामाजिक प्रतिष्ठा आणि कुटुंबिक सौख्य यावरही होतो. अशा स्थितीत ज्यांच्या राशीवर शुक्राची विशेष कृपा असते, त्यांना प्रत्येक बाबतीत यश मिळतं. चैत्र पौर्णिमेनंतरची ही स्थिती विशेषतः धनु (Sagittarius), वृषभ (Taurus), मकर (Capricorn), कर्क (Cancer) आणि कुंभ (Aquarius) राशींसाठी अत्यंत शुभदायक ठरेल.

‘या’ राशींना होणार फायदा-
धनु राशी
या राशीच्या लोकांसाठी हा काळ यशाचे दार उघडणारा ठरेल. नोकरी मिळेल, पदोन्नतीची शक्यता आहे आणि मानसिक तणाव दूर होईल. भौतिक सुख सुविधांमध्ये वाढ होईल.
वृषभ राशी
या राशीचे लोक आर्थिक अडचणींपासून मुक्त होतील. मालमत्ता खरेदीचे योग आहेत. मित्रांचा आणि नातेवाईकांचा आधार मिळेल. समृद्धीची शक्यता आहे.
मकर राशी
या राशीच्या विद्यार्थ्यांना परीक्षांमध्ये यश मिळू शकते. कार्यालयात उत्तम कामगिरीमुळे वरिष्ठांचा सन्मान मिळेल. प्रवासाचे योग आणि आर्थिक लाभ संभवतो.
कर्क राशी
या राशीच्या लोकांना कौटुंबिक सुख लाभेल. उत्पन्न वाढेल. धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमात सहभाग असेल. गुंतवणुकीवर लाभ मिळेल.
कुंभ राशी
या राशीवर शुक्राचा विशेष प्रभाव जाणवेल. उत्पन्नाचे नवीन मार्ग मिळतील, आरोग्यात सुधारणा होईल, आणि प्रगतीची अनेक दारे उघडतील.
या 5 राशींना धन, यश आणि मानसिक समाधानाची एकत्रित भेट मिळेल. त्यामुळे या काळाचा पुरेपूर फायदा घ्यावा आणि नव्या संधींचं स्वागत करावं.