Mars Transit : ज्योतिषशास्त्रात ग्रह, कुंडली, नक्षत्र आणि योग ,राजयोग यांना खूप महत्त्व आहे. जेव्हाही ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात तेव्हा त्याचा पृथ्वी सोबतच मानवी जीवनावर देखील परिणाम होतो. नोव्हेंबरप्रमाणेच डिसेंबरमध्येही ग्रहांचे मोठे संक्रमण होणार आहे. डिसेंबरमध्ये ग्रहांच्या हालचालींमुळे असेच काही राजयोग तयार होणार आहेत, ज्याचा फायदा स्थानिकांना होणार आहे.
डिसेंबरमध्ये बुध, शुक्र, सूर्य, मंगळ आणि गुरू आपल्या चाली बदलणार आहेत. दरम्यान, डिसेंबरच्या अखेरीस वृश्चिक राशीमध्ये मंगळ आणि शुक्राचा संयोग होईल, ज्यामुळे धन शक्ती योग तयार होईल, जो तीन राशींसाठी खूप फायदेशीर मानला जात आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, धैर्य, उर्जा, शौर्य आणि ग्रहांचा सेनापती मंगळ ग्रहाने 16 नोव्हेंबर रोजी वृश्चिक राशीत प्रवेश केला आणि 41 दिवस तेथे राहील आणि त्यानंतर 28 डिसेंबर रोजी तो वृश्चिक राशीतून बाहेर पडून धनु राशीत प्रवेश करेल. धन, सुख, वैभव आणि ऐशोआरामाचा कारक शुक्र देखील डिसेंबर महिन्यात 25 तारखेला वृश्चिक राशीत संक्रमण करेल. या काळात वृश्चिक राशीमध्ये मंगळ आणि शुक्राचा संयोग थोड्या काळासाठी होईल आणि धन शक्ती योग तयार होईल, जो 3 राशींसाठी खूप शुभ ठरणार आहे.
मिथुन
मंगळ आणि शुक्राचा संयोग आणि धनशक्ती योगाची निर्मिती मिथुन राशीच्या लोकांसाठी खूप फलदायी ठरू शकते. या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. व्यावसायिकांसाठी हा काळ चांगला राहील. तसेच या काळात उत्पन्न वाढेल आणि उत्पन्नाचे नवे स्रोतही उघडतील. जर तुमचा व्यवसाय परदेशात असेल तर तुम्हाला मोठा नफा मिळू शकतो. समाजात पद आणि प्रतिष्ठा वाढेल. विद्यार्थ्यांनाही वेळोवेळी सहकार्य मिळेल आणि त्यांचा अभ्यासात फायदा होईल. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाऊ शकता.
सिंह
मंगळ आणि शुक्राचा संयोग आणि धनशक्ती योगाची निर्मिती राशीच्या लोकांसाठी उत्तम ठरेल. तुमच्या कामात तुम्हाला यश मिळेल. प्रदीर्घ प्रलंबित कामांना गती मिळू शकते. नोकरदार लोकांसाठी देखील हा काळ चांगला राहील, त्यांना या काळात यश मिळेल, तसेच या काळात नवीन संधी मिळण्याची देखील दाट शक्यता आहे. पदोन्नती, पगारात वाढ, नवीन नोकरीच्या ऑफर देखील या काळात येऊ शकतात. तुम्ही या काळात वाहन, नवीन घर, मालमत्ता इत्यादी खरेदी करू शकता.
वृश्चिक
वृश्चिक राशीमध्ये धनशक्ती योग तयार झाल्यामुळे तुम्हाला खूप शुभ फळं मिळतील. तसेच धनशक्ती योग आणि ग्रह योग या राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरू शकतात. या काळात आत्मविश्वास देखील वाढेल. न्यायालयीन प्रकरणांमध्येही या काळात यश मिळेल. आर्थिक स्थिती देखील मजबूत होईल. वैवाहिक जीवनातही आनंद मिळू शकतो. भागीदारीत केलेला व्यवसाय यशस्वी आणि फायदेशीर देखील असू शकतो. या काळात निर्णय घेताना थोडे विचारपूर्वक घ्या. ज्याचा परिणाम भविष्यात जाणवू शकतो.