प्रदोष व्रताच्या दिवशी महिलांनी करावे ‘हे’ उपाय, मिळेल भोलेनाथचा आशीर्वाद!

गुरु प्रदोष व्रताच्या दिवशी महिलांनी काही साधे उपाय केल्यास दुःख दूर होते आणि आयुष्यात सुख, समाधान व समृद्धीचा मार्ग खुला होतो. या उपायांनी भोलेनाथची विशेष कृपा लाभते.

Published on -

Pradosh Vrat 2025 | हिंदू धर्मात प्रदोष व्रताचे विशेष महत्त्व मानले जाते. महादेवाला समर्पित असलेले हे व्रत प्रत्येक महिन्यात दोनदा त्रयोदशी तिथीला येते. या महिन्यात चैत्रातील दुसरे प्रदोष व्रत 10 एप्रिल रोजी गुरुवारी येत असल्याने त्याला गुरु प्रदोष व्रत म्हणतात. पंचांगानुसार त्रयोदशी तिथी 9 एप्रिलच्या रात्री 10:55 वाजता सुरू होईल आणि 10 एप्रिल रोजी संपेल. या दिवशी पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त संध्याकाळी 6:44 पासून 8:59 पर्यंतचा आहे.

महिलांसाठी हा दिवस खूप फलदायी मानला जातो. उपवासासोबत काही विशेष उपाय केल्यास आयुष्यात येणाऱ्या अडचणी, चिंता, आर्थिक अडथळे आणि कौटुंबिक तणाव दूर होऊ शकतात. विशेषत: विवाहित महिलांनी केलेले उपाय अधिक प्रभावी मानले जातात.

कोणते उपाय करावेत?

या दिवशी भगवान शंकराचे ध्यान आणि मंत्रजप करत राहणे अत्यंत लाभदायक मानले जाते. संध्याकाळच्या काळात पूजा करताना पवित्र भाव ठेवावा आणि सकारात्मक विचार करावेत.

महिलांनी 7 पिवळे तांदळाचे दाणे घेतले पाहिजेत आणि आपल्या नावासह गोत्राचे उच्चारण करून शिवलिंगावर अर्पण करावं. त्यानंतर तेच दाणे पिंपळ किंवा बेलपत्राच्या झाडाच्या मुळाशी ठेवावेत. यापूर्वी शंकराला जल अर्पण करणं आवश्यक आहे.

दिवा लावणे देखील महत्त्वाचं आहे. महिलांनी मातीचा किंवा पिठाचा दिवा तयार करावा आणि त्यात शिव-शक्तीच्या नावाने दोन दिवे प्रज्वलित करावेत. शक्य असल्यास हे दिवे आपल्या तळहातावर घेऊन मंदिरात किंवा बेलाच्या झाडाखाली ठेवावेत.

विवाहित महिलांनी हिरव्या बांगड्यांचे दान केल्यास वैवाहिक जीवनात गोडवा वाढतो. शिवाय देवी पार्वतीला सिंदूर, बिंदी, मेहंदी आणि अल्तासारखे सौभाग्यवर्धक साहित्य अर्पण केल्यास यश आणि सुख प्राप्त होतं.

या दिवशी केलेली उपासना भक्तांच्या जीवनातील सर्व दुःख दूर करते. भगवान शंकर प्रसन्न होऊन आपल्या भक्तांच्या चिंता, क्लेश, अडथळे दूर करतात. प्रदोष व्रत पाळल्याने आयुष्यात शांती, समृद्धी आणि आध्यात्मिक उन्नती प्राप्त होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe