वाईट काळ संपला ! दसऱ्यापासून ‘या’ राशीच्या लोकांचे अच्छे दिन सुरु होणार, वाचा सविस्तर

Zodiac Sign : नवरात्र उत्सवाची रंगत सध्या जोरात आहे. हा शारदीय नवरात्रोत्सव अनेकांसाठी खास ठरतोय. पण आता येत्या काही दिवसांत याची सांगता होणार आहे. मग त्यानंतर विजयादशमीचा दिवस येईल. हिंदू धर्मात या दिवसाला विशेष महत्त्व आहे.

दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असून या दिवशी प्रत्येक जण शुभ कार्य करत असतो. कोणतेही नवीन कार्य, खरेदी-विक्री किंवा व्यवसायाचा शुभारंभ करण्यासाठी हा काळ अत्यंत फलदायी ठरत असतो.

दरम्यान यावर्षी विजयादशमीच्या दिवशी ग्रह आपली चाल बदलणार आहे. दसऱ्याला बुध ग्रह तूळ राशीत प्रवेश करणार आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार बुधाच्या या संक्रमणाचा पाच राशींवर विशेष सकारात्मक परिणाम दिसून येईल. या राशींच्या जातकांना करिअर, व्यवसाय, आर्थिक आणि वैयक्तिक जीवनात मोठे यश मिळू शकते.

तूळ : बुधाच्या प्रवेशामुळे तुमचे व्यक्तिमत्व आकर्षक बनेल. नोकरीत किंवा व्यवसायात धाडसी निर्णय घेण्याचा फायदा होईल. आर्थिक स्थिती सुधारेल आणि प्रेमसंबंध अधिक दृढ होतील.

कर्क : दीर्घकाळाच्या अडचणी दूर होतील. नवी आर्थिक संधी मिळेल. मालमत्तेचे लाभ संभवतात. आत्मविश्वास वाढेल आणि सामाजिक क्षेत्रात तुमची प्रतिष्ठा उंचावेल.

मेष : बुध-मंगळ युतीमुळे व्यवसायात प्रगती होईल. शौर्य आणि धैर्य वाढेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. करिअरमध्ये यश आणि जोडीदारासोबत सुखी क्षण मिळतील.

याशिवाय सिंह आणि धनु राशींसाठीही हा काळ शुभ मानला जात आहे. या राशींच्या जातकांना अचानक आर्थिक लाभ, नवी कामे आणि सामाजिक मान-सन्मान मिळण्याची शक्यता आहे.

अशाप्रकारे, शारदीय नवरात्राची सांगता आणि त्यानंतरची विजयादशमी केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे, तर ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनेही काही राशींसाठी अत्यंत शुभ वार्ता घेऊन येत आहे.