NABARD Bharti 2024 : राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक अंतर्गत बंपर भरती निघाली आहे, या भरती अंतर्गत विविध रिक्त जागा भरल्या जणार असून, इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकद्वारे आपले अर्ज सादर करावेत.
वरील भरती अंतर्गत “मुख्य तंत्रज्ञान अधिकारी, प्रकल्प व्यवस्थापक- अनुप्रयोग व्यवस्थापन, लीड ऑडिटर, अतिरिक्त मुख्य जोखीम व्यवस्थापक, वरिष्ठ विश्लेषक – सायबर सुरक्षा ऑपरेशन्स, जोखीम व्यवस्थापक – क्रेडिट जोखीम, जोखीम व्यवस्थापक- मार्केट जोखीम, जोखीम व्यवस्थापक- ऑपरेशनल जोखीम, जोखीम व्यवस्थापक – IS आणि सायबर सुरक्षा , सायबर आणि नेटवर्क सुरक्षा विशेषज्ञ, डेटाबेस आणि ऑपरेटिंग सिस्टम विशेषज्ञ, IT पायाभूत सुविधा आणि बँकिंग विशेषज्ञ, अर्थशास्त्रज्ञ,
![NABARD Bharti 2024](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2024/02/NABARD-Bharti-2024-.jpg)
क्रेडिट अधिकारी, कायदेशीर अधिकारी, ETL विकसक, डेटा सल्लागार, व्यवसाय विश्लेषक, पॉवर BI अहवाल विकसक, विशेषज्ञ- डेटा व्यवस्थापन, आर्थिक समावेशक सल्लागार- तांत्रिक, आर्थिक समावेशक सल्लागार- बँकिंग” पदांच्या एकूण 31 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 असून, लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत.
वरील पदांसाठी पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. तसेच यासाठी अर्ज शुल्क भरणे देखील आवश्यक आहे, SC/ ST/ PWBD उमेदवारांसाठी हे शुल्क 50/- रुपये तर सामान्य उमेदवारांसाठी 800/- रुपये इतके शुल्क आहे.
वरील पदासाठी वयोमर्यादा देखील गरजेची असेल, यासाठी वयोमर्यादा 45 ते 62वर्षे इतकी आहे. या भरती विषयी अधीक माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईट https://www.nabard.org/ ला भेट द्या.
अशा पद्धतीने करा अर्ज
-या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज करण्यासाठी उमेदवार या लिंकवर क्लिक करू शकतात. लक्षात घ्या अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलेला असावा.
-अर्ज पूर्ण भरलेला असावा, अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. तसेच अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
-अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचा.