हवामानाचा शेतीव्यवसायाला सर्वाधिक फटका ! टोमॅटोचे भाव वाढले, मात्र कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत

Ahmednagarlive24 office
Published:

Agricultural News :  बदलत्या हवामानाचा शेतीव्यवसायाला सर्वाधिक फटका बसत आहे. त्यामुळे अनेक वस्तुंचे भाव गगनाला भिडले आहेत. यापूर्वी टोमॅटोचा भाव उतरल्याने ते रस्त्यावर फेकून देण्यात आले होते.

पण आता टोमॅटोचा भाव ऐकून अनेकांचे चेहरे लाले लाल होत आहेत. सध्या बाजारात भाजीपाल्याचे दर चांगलेच वाढलेले आहेत तर दुसरीकडे कांद्याच्या दरात मात्र धरसोड होत आहे. त्यामुळे शेतकरी देखील संभ्रमात आहेत.

अनेक भागात अद्यापही समाधानकारक पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे या भागात शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. तर ज्या भागात पाऊस झाला आहे त्या भागातील शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त झाला आहे.

त्यामुळे आठवडे बाजारात भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. परिणामी भाजीपाल्यांच्या दरात तेजी आली आहे. बेमोसमी पावसामुळे परिसरामध्ये विहिरींना मुबलक पाणी असल्याने यंदा उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी भेंडी, गवार,

ढोबळी मिरची, वांगे, टोमॅटो, कोबी, मिरची, कारले, दोडके, मेथी, पालक, कोथिंबीर आदी भाजीपाला पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली होती. आता बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक घटली आहे. त्यामुळे बाजारात भाजीपाल्याचे दर वधारले आहेत.

अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळालेले दर : टोमॅटो ३०००-९०००, वांगी १०००-३००० फ्लावर १००० – ४५००, कोबी ५०० – २०००, काकडी ५०० – २०००, गवार ४००० ७०००, घोसाळे २५०० ४५००, – – दोडका २५०० – ४५००, कारले ३००० ६०००, कैरी १०००-३०००, भेंडी २५०० ४०००, वाल २०००-६०००, घेवडा ८०००- १०,०००, बटाटे ७०० – १६००, लसूण ३५००- ५५००, हिरवी मिरची ३५०० – ८०००, शेवगा ३५०० – ५५००, भू. शेंग २५०० ५१००, लिंबू – ७०० – १५००, आद्रक ९०००- १४,५००, गाजर २००० – २५००, दु. भोपळा १०००- १५००, शिमला मिरची १५०० – ४५००, मेथी २००० – ३२००, कोथिंबीर १६०० – २६००, पालक १००० – २०००, शेपू भाजी ३०००- ३६००, चुका १४०० – १४००, चवळी ३००० – ५५००.

दरम्यान आषाढी एकादशीला कांद्याला सर्वाधिक म्हणजे २००० रूपये क्विंटल एवढा भव मिळाला होता. त्यानंतर जवळपास तोच भाव टिकून राहीला होता. भाव चांगला मिळत असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कांदा विक्रीसाठी आणला जात आहे.

शनिवारी मात्र कांद्याला १८०० रूपये भाव मिळाल्याने कांदा उत्पादक शेतकरी चिंतीत झाले आहेत. शनिवारी तब्बल ५३० ट्रक म्हणजे १ लाख ६० हजार २० कांदा गोण्यात ५८ हजार ३११ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. यातील एक नंबर कांद्याला १५०० – १८००, दोन नंबर १०००-१५००, तिन नंबर ५००-१०००, चार नंबर २०० ५०० – असा भाव मिळाला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe