शेतकऱ्यांसाठी कामाची बातमी ! ट्रॅक्टरचे ट्रेलर खरेदी करण्यासाठीही मिळणार एक लाख रुपयांचे अनुदान, अर्ज कुठे करावा?

Published on -

Agriculture News : महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील विविध घटकांसाठी असंख्य योजना सुरू करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांसाठी देखील राज्य शासनाने आतापर्यंत शेकडो योजना सुरु केल्या आहेत.

या योजनांच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना विविध बाबींसाठी मदत पुरवली जाते. शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी सुद्धा अनुदान दिले जाते.

एवढेच नाही तर ट्रॅक्टरच्या ट्रेलरसाठी सुद्धा महाराष्ट्र राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून अनुदान उपलब्ध करून दिले जात असून आज आपण याच संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

किती अनुदान मिळणार?

आजच्या ह्या आधुनिक युगात शेतीमध्ये यंत्रांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आधुनिक यंत्रांच्या वापरामुळे शेतीमधून मिळणाऱ्या उत्पादनात आणि उत्पन्नात वाढ झाली आहे. मात्र ट्रॅक्टर सारखे यंत्र खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा पैसाही खर्च करावा लागतो.

आता अल्पभूधारक आणि अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना एवढा मोठा पैसा उभा करणे म्हणजे अवघडच आहे. याचसाठी ट्रॅक्टर खरेदी करणे हेतू शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते.

तसेच सरकारकडून दोन चाकी 3 टन व 5 टन क्षमतेचे ट्रेलर खरेदीसाठी अनुदान मिळते. शेती औजार खरेदीसाठी सुद्धा 40 हजारांपासून 75 हजारांपर्यंत अनुदान मिळतं आहे.

शेतीमध्ये ट्रेलरचा सुद्धा उपयोग होतो. ट्रॉलीचाचा उपयोग प्रामुख्याने उत्पादन, खते, औजारे, तसेच इतर साहित्य वाहून नेण्यासाठी केला जात असतो. ट्रेलरच्या किमती साधारणत अडीच लाख रुपयांपर्यंत असतात.

आता कृषी अवजारांवरील GST सुद्धा कमी झाला आहे. जीएसटी मध्ये कपात झाली असल्याने ट्रेलर च्या किमती सुद्धा थोड्या कमी होणार आहेत. कृषी अवजारांच्या किमती साधारणता एक लाख रुपयांपर्यंत कमी होतील.

दुसरीकडे शासनाकडून कृषी अवजारांच्या खरेदीवर 40000 पासून 75000 पर्यंत अनुदान मिळेल. थोडक्यात आता शेतकऱ्यांना कृषी अवजारे खरेदी करणे सोपे होणार आहे.

ट्रेलर बाबत बोलायचं झालं तर याच्या खरेदीवर एक लाख रुपयांपर्यंतचे अनुदान मिळेल. 3 टन साठी 75000 आणि 5 टनसाठी एक लाख रुपये अनुदान मिळते.

यासाठी अर्ज करायचा असल्यास शेतकऱ्यांना शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा लागेल. महाडीबीटी पोर्टल वर जाऊन शेतकऱ्यांनी तातडीने अर्ज सादर करावे असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्त्वावर शेतकऱ्यांना ट्रेलर साठी अनुदान मिळणार आहे. नक्कीच शासनाची ही योजना शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरणार आहे. दरम्यान जर तुम्हाला योजनेबाबत अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही कृषी विभागात जाऊन योजनेची डिटेल घेऊ शकता. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News