Jamun Rate : जांभळाचे दर प्रतिक्विंटल १५ हजार रुपयांवर!

Ahmednagarlive24 office
Published:
Jamun Rate

Jamun Rate : राज्यात जांभळाची मागणी दिवसेंदिवस वाढत असून त्याचे सरासरी दर आता प्रतिक्विंटल पंधरा हजार रुपयांवर पोहोचले आहेत. हंगामाचे काही दिवस शिल्लक राहिल्याने ही वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात येत आहे.

जांभूळ व्यापारासाठी प्रसिद्ध असलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील बाजार समितीत सध्या स्थानिक मालासह जालना, नांदेड तसेच राज्यातील इतर जिल्ह्यातून आणि गुजरातमधून जांभळाची आवक होत आहे.

यामध्ये गुजरातमधून होणारी आवक अधिक असून या हंगामात मागणीदेखील वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. येथे २२ ते २८ जून या कालावधीत दररोज ३ ते २५ क्विंटलदरम्यान मालाची आवक होत होती. यावेळी जांभळाला प्रतिक्विंटल ७ हजार ते १७ हजार ५०० रुपयांपर्यंत दर मिळाला होता.

त्यानंतरही १ ते ४ जुलै दरम्यान १५ हजारांपर्यंत दर मिळाला असला तरी सरासरी दर मात्र कमी राहिले. या चार दिवसांत जांभळाचे प्रतिक्विंटल सरासरी दर अनुक्रमे ४२५०, ५५००, ९०००, १०००० रुपये नोंदले गेले.

विशेष म्हणजे या वेळी आवकही अनुक्रमे ३२, १५, २४, २४ क्विंटल अशी लक्षणीय झाली होती. मात्र, ५ जुलैला बाजारातील सरासरी दर १४५०० रुपयांवर पोहोचला. यावेळी आवक २५ क्विंटल एवढी होती आणि दर किमान ११००० रुपये आणि कमाल १८००० रुपयांवर होते.

६ जुलै रोजी आवक झालेल्या ३२ क्विंटल मालाला मात्र आतापर्यंतचा सर्वाधिक दर मिळाला. यावेळी किमान १२००० तर कमाल १८ हजार रुपयांची नोंद करत यावेळचा सरासरी दर १५ हजार रुपयांच्या घरात पोहोचला. यामुळे जांभळाला राज्यात मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe