बाजारपेठेत आवक मात्र तेजीत, पण दर मात्र स्थिर काय आहेत हरभारा-सोयाबीनचे दर ! वाचा सविस्तर

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2022 Maharashtra News:- बाजारात पेठेत सध्या खरिपातील आणि रब्बी हंगामातील सोयाबीन- हरभरा ही पिके विक्रीसाठी येत आहेत. त्याला बाजारपेठेत आवकही चांगली आहे.

पण दर मात्र स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये खरेदी केंद्र सुरू झाली असून सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोयाबीनचे दर स्थिर असूनही आवक मात्र कायम आहे.

तर दुसरीकडे हरभऱ्याच्या आवकवर काय परिणाम होणार हे पाहिले जात आहे. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हरभऱ्याची 30 हजार तर सोयाबीन ची 20 हजार पोत्यांची आवक झाली आहे.

शिवाय खुल्या बाजारपेठेतील दरात वाढत नसल्याने खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. त्यामुळे शेतकरी आता खरेदी केंद्र जवळ करू लागले आहेत. आतापर्यंत नियम-अटीमुळे शेतकरी केंद्राकडे दुर्लक्ष करीत होता.

पण बाजारपेठेतील दर कमी होत असल्याने नोंदणी वाढत असल्याचे केंद्र चालक लालासाहेब देशमुख यांनी सांगितले आहे. तर बाजारपेठेतील नियम-अटी मान्य करुन शेतकरी नोंदणी करु लागले आहेत.

आतापर्यंत हरभऱ्याची विक्री ही खुल्या बाजारपेठेमध्येच होत होती. मात्र, बाजारपेठेतील दर 4 हजार 600 वरच अडकून बसलेले आहेत.तर खरेदी केंद्रावर हरभऱ्याचा 5 हजार 230 हा हमीभाव दर मिळत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe