Pm Kisan Yojana : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाने मोठे नुकसान केले होते आणि आता सप्टेंबरमध्ये देखील तशीच परिस्थिती असल्याने शेतकरी बांधव संकटात सापडले आहे.
राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान पीएम किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे.

खरंतर उत्तराखंड पंजाब आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये तयार झालेल्या पूरपरिस्थितीमुळे केंद्रातील सरकारने वेळेआधीच 21 वा हप्ता जाहीर केला आहे.
दोन ऑगस्ट रोजी पीएम किसान च्या सर्वच लाभार्थ्यांना विसावा हप्ता देण्यात आला होता. यानंतर आता लगेचच केंद्रातील सरकारकडून यासंबंधीत पूरग्रस्त राज्यांमध्येल शेतकऱ्यांना 21 वा हप्ता देण्यात आला आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे पी एम किसान च्या सर्वच लाभार्थ्यांना येत्या काही दिवसांनी 21 वा हप्ता मिळणार आहे. अशातच आता पीएम किसान योजनेच्या नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
योजनेत झालेल्या नव्या बदलानुसार आता ज्या शेतकऱ्यांकडे जमिनीचे कागदपत्रे (उदा. सातबारा) उपलब्ध नाहीत, त्यांनाही आता या योजनेचा लाभ मिळू शकतो.
यासाठी राज्य सरकारने संबंधित शेतकरी प्रत्यक्षात शेती करतो याची पुष्टी करणे आवश्यक आहे. अर्थात राज्य सरकारने प्रमाणपत्र दिल्यास शेतजमीन नावावर नसणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे मिळणार आहेत.
सीमावर्ती भागातील शेतकऱ्यांना या बदलामुळे मोठा फायदा होणार आहे. पीएम किसान योजनेबाबत बोलायचं झालं तर या अंतर्गत दरवर्षी सहा हजार रुपयांची मदत दिली जाते.
शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी ही योजना सुरू झाली असून या अंतर्गत आत्तापर्यंत पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना एकूण 20 हप्ते मिळाले आहेत. या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्याच्या दोन हजार रुपयांची मदत दिली जाते.
यानुसार आतापर्यंत 20 हफ्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत आणि 21 वा हप्ता पुढील महिन्यात पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येतील अशी माहिती समोर येत आहे.