Sarkari Yojana Information : ‘या’ योजनेचा फायदा घ्या, फक्त खाते उघडा आणि २ लाखांपर्यंतचा अपघात विमा….

Sarkari Yojana Information : सरकार (Government) वेळोवेळी गोरगरिबांसाठी नवनवीन योजना घेऊन येत असते, मात्र अपुरी माहिती व योग्य सल्ला मिळत नसल्याने लोक सरकारी योजनांपासून वंचित राहतात. मात्र या योजनेतून तुम्हाला फायदा घेण्यासाठी सविस्तर जाणून घ्या.

पंतप्रधान जन धन योजना (Jan Dhan Yojana) ही भारत सरकारने सुरू केलेल्या सर्वात महत्त्वाच्या योजनांपैकी एक आहे. हे देशातील करोडो लोकांना आर्थिक लाभ (DBT) प्रदान करते. २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) योजना सुरू केल्यापासून आतापर्यंत ३८ कोटींहून अधिक जनधन खाती उघडण्यात आली आहेत.

देशातील अनेक खाजगी बँका (Bank) त्यांच्या शाखांमध्ये जन धन खाते उघडण्यास परवानगी देतात. आरबीआयच्या (RBI) नियमांनुसार, एखाद्या व्यक्तीकडे आवश्यक कागदपत्रे नसली तरीही, तो कमी ठेव आणि पैसे काढण्याच्या मर्यादेसह जन धन खाते उघडू शकतो.

जन धन खाते उघडण्यास परवानगी असलेल्या खाजगी बँकांची यादी

एचडीएफसी बँक (HDFC)

अॅक्सिस बँक (Axis bank)

आयसीआयसीआय बँक (ICICI)

येस बँक (Yes Bank)

फेडरल बँक

कोटक महिंद्रा बँक

कर्नाटक बँक

इंडसइंड बँक

आयएनजी वैश्य बँक

धनलक्ष्मी बँक

जन धन खात्याचे फायदे

– जन धन खातेधारकांना २ लाखांपर्यंतचा अपघात विमा संरक्षण मिळते.

– PMJDY अंतर्गत पैसे काढण्याची मर्यादा १०,००० रुपये प्रति महिना आहे.

– खातेदार या योजनेअंतर्गत खात्यात जास्तीत जास्त १,००,००० रुपये जमा करू शकतात.

– बँका मोफत मोबाईल बँकिंग सुविधा देतात. खातेधारक त्यांच्या जन धन खात्यातील शिल्लक सहज तपासू शकतात.

– खातेधारकांना १०,००० रुपयांपर्यंतच्या ओव्हरड्राफ्ट सुविधेसह रुपे डेबिट कार्ड देखील मिळते.

– PMJDY खातेधारक PM किसान आणि श्रम योगी मानधन योजना यांसारख्या थेट लाभाच्या योजनांसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.

– महिला खातेधारकांना त्यांच्या जनधन खात्यांमध्ये LPG सबसिडी आणि उज्ज्वला योजनेअंतर्गत रिफिल फीचा थेट लाभ मिळतो.

– खातेधारकांना ३०,००० रुपयांचे जीवन विमा संरक्षण देखील मिळते.

जन धन योजना खाते कसे उघडावे

जन धन योजना खाते उघडण्यासाठी तुम्हाला अर्ज प्राप्त करावा लागेल, जो इंग्रजी आणि हिंदी दोन्ही भाषेत उपलब्ध आहे आणि PMJDY च्या अधिकृत वेबसाइट pmjdy.gov.in वर भेट द्यावी लागेल. नंतर ते भरा आणि आवश्यक कागदपत्रांसह सबमिट करा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe