शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबवली आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दर 4 महिन्यांनी 2000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. शेतकऱ्यांना वर्षाभरात 6000 रुपयांची मदत मिळते. या योजनेचा 20 वा हप्ता येणार आहे. हा हप्ता कधी येईल? या चर्चा सुरु झाल्या आहेत.
काय आहे योजना?
शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्यता देण्यासाठी सरकारने ही योजना सुरु केली आहे. शेतकऱ्यांना वर्षभरात सरकारकडून सहा हजार रुपये दिले जातात. दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये याप्रमाणे वर्षात तीन हप्यांमध्ये ही रक्कम दिली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे. शेतीच्या जमिनीचा मालक असणे आवश्यक आहे. पती, पत्नी आणि अल्पवयीन मुले असलेले संयुक्त कुटुंबाला एकत्रितपणे या योजनेचा लाभ घेता येतो.

कधी येणार २० वा हप्ता
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 फेब्रुवारी 2025 रोजी किसान सन्मान निधीचा 19 वा हप्ता हस्तांतरित केला. पीएम किसान योजनेअंतर्गत, 20 वा हप्ता जून 2025 पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात येऊ शकतो. अंतिम तारीख आणि ठिकाण याबद्दल अद्याप कोणतीही माहिती नाही.
काय आहे आवश्यक?
1. ई-केवायसी करणे आवश्यक आहे.
2. मोबाईल आणि बँक खाते लिंकिंग करणे आवश्यक आहे.
3. बँक तपशील आणि आधार कार्ड माहिती देणे आवश्यक आहे.
हप्ता कसा तपासायचा?
– सर्वप्रथम तुम्हाला योजनेच्या अधिकृत वेबसाइट Pmkisan.gov.in ला भेट द्यावी लागेल.
– तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही योजनेच्या किसान अॅपला देखील भेट देऊ शकता.
– येथे तुम्हाला ‘लाभार्थी यादी’ पर्यायावर क्लिक करावे लागेल.
– त्यानंतर तुम्हाला तुमचे राज्य निवडावे लागेल, त्यानंतर तुमचा जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडावे लागेल.
– यानंतर तुम्हाला ‘रिपोर्ट मिळवा’ बटणावर क्लिक करावे लागेल.
– त्यानंतर लाभार्थ्यांची यादी तुमच्या समोर येईल, जर तुमचे नाव या यादीत असेल तर तुम्हाला हप्त्याचा लाभ मिळेल.