अद्रकची लागवड करताय, मग ‘या’ सुधारित जातीची लागवड करा, भरघोस उत्पादन मिळणार !

Published on -

Ginger Farming : आले हे एक प्रमुख कंदवर्गीय पीक आहे. यामध्ये असणारे औषधी गुणधर्म मानवी आरोग्यासाठी खूपच फायदेशीर ठरतात. म्हणून बाजारात याला कायमच मागणी असते. विशेष म्हणजे बारा महिने या पिकाला मागणी असते.

हेच कारण आहे की, अलीकडे आल्याची लागवड वाढू लागली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये हे पीक मोठ्या प्रमाणात उत्पादित केले जाऊ लागले आहे. याची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. मात्र असेल तरी या पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवायचे असेल तर याच्या सुधारित वाणाची निवड करणे आवश्यक आहे.

त्यामुळे आज आपण आल्याचा काही सुधारित वाणाची माहिती जाणून घेणार आहोत. कृषी तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे जर आपणास आले पिकाची लागवड करायची असेल तर एप्रिल आणि मे महिन्यात तुम्ही याची लागवड करू शकता. एप्रिल किंवा मे महिन्याच्या अखेरीस याची लागवड केली तर नोव्हेंबर- डिसेंबर महिन्यात याचे पीक तयार होत असते. पण आल्याच्या सुधारित वाणांचीच लागवड करा असा सल्ला कृषी तज्ञांनी दिला आहे.

आल्याच्या सुधारित जाती कोणत्या ? अथिरा : आल्याची ही एक सुधारित जात आहे. राज्यातील अनेक शेतकरी या वाणाची लागवड करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या जातीचे पीक 220 ते 240 दिवसात परिपक्व होते. या वाणापासून प्रति एकर 84 ते 92 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळते.

मरान : ही देखील आल्याची एक सुधारित जात आहे. शेतकऱ्यांमध्ये आल्याचा हा देखील वाण लोकप्रिय असल्याचे बोलले जाते. तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार या जातीचे पीक सरासरी 230 ते 240 दिवसात परिपक्व होते. तसेच या मनापासून 175 ते 200 क्विंटल प्रति हेक्टर पर्यंतचे उत्पादन मिळत असल्याचा दावा केला जात आहे.

सुरभी : आले या कंदवर्गीय पिकाची एक सुधारित जात आहे. राज्यातील अनेक शेतकरी या वाणाची शेती करत असल्याची माहिती समोर आली आहे. या जातीचे पीक सरासरी 225 ते 235 दिवसात हार्वेस्टिंग साठी तयार होत असते. या वाणापासून एक 83 ते 100 क्विंटल पर्यंतचे दर्जेदार उत्पादन मिळू शकते. तथापि उत्पादन हे सर्वस्वी शेतकरी नियोजन, हवामान, पाणी व्यवस्थापन यांसारख्या वेगवेगळ्या बाबींवर अवलंबून राहते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe