अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :- पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील आंबीखालसा फाट्यावर ऊस तोड कामगारांच्या बैलगाडीला कारने जोराची धडक दिली. या अपघातात एक बैल जखमी तर एक बैल अंत्यस्थ झाल्याची घटना घडली आहे.
तर कामगार कीरकोळ जखमी झाले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, ऊस तोड कामगार हे आप आपल्या बैलगाड्या घेऊन ऊस तोडणी करण्यासाठी आंबीखालसा येथे चालले होते.
तर महामार्ग ओलांडत असताना भरधाव वेगाने पुण्याहुन नाशिकच्या दिशेने चाललेल्या कारने बैलगाडीला जोराची धडक दिली.
या अपघातात बैल हा गंभीर स्वरुपाचा जखमी होऊन त्यात त्याचे पुढील पाय मोडुन अंत्यस्थ झाला व दुसरा बैल हा किरकोळ जखमी झाला केवळ दैव बलवत्तर म्हणून बैलगाडीत बसलेल्या सुरासे यांच्या कुटुंबाला किरकोळ दुखापत झाली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम