अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2022 :- जेजुरीला देवदर्शनासाठी चाललेल्या नगर तालुक्यातील खडकी येथील भाविकांच्या दोन वाहनांवर कंटेनर आदळून झालेल्या विचित्र अपघातात नऊ जण जखमी झाले असून, त्यातील पाच जण गंभीर आहेत.
सुपे-मोरगाव मार्गावर बारामती तालुक्यातील सुपे गावाजवळ हा अपघात झाला. याबाबत अधिक माहिती अशी की, नगर तालुक्यातील खडकी येथील भाविक जेजुरीला देवदर्शनासाठी दोन मोटारींमधून महिला-मुलांसह १४ जण प्रवास करत होते.

सुप्यात चहा घेऊन गाडीत बसत असतानाच पाठीमागील उतारावरून वळणावर एक कंटेनर उलटून घसरत सुमारे ३०-४० फुटांवर थांबलेल्या या गाड्यांवर आदळला.
काही क्षणात झालेल्या या अपघातात गाडीत बसलेले व बसत असलेले सर्वजण जखमी झाले. कंटनेरच्या धडकेने दोन गाड्यांमधील एक गाडी रस्त्याच्या विरूद्ध बाजुला सुमारे अडिचशे फुटांवर असलेल्या चहाच्या हॉटेल जवळ जाऊन थांबली.
सुदैवाने हॉटेल बाहेर ग्राहक नव्हते व रस्त्यावर अन्य वाहने नसल्याने मोठा अनर्थ टळला. या अपघातात हॉटेलचे देखील नुकसान झाले. या अपघातात बाबासाहेब वाडेकर, स्वाती नवनाथ रोकडे, संध्या अनिल रोकडे, तात्या काळे,
काजल विठ्ठल कोकरे, नाथा सतीश रोकडे, अंबादास भाऊसाहेब रोकडे, नवनाथ रोकडे, विठ्ठल शिवाजी कोकरे (सर्व रा.खडकी ता.नगर) हे जखमी झाले आहेत.
अपघात घडला त्यावेळी कंटेनर कोसळ्याचा मोठा आवाज आल्याने गावकरी मदतीसाठी धावले. अपघातानंतर कंटेनरचालक पसर झाला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम