आता जामखेडमध्ये पडसाद ! दुपारी नमाज पठणनंतर मुस्लिम समाज रस्त्यावर

जामखेड तालुक्यातील व शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. तीन तासाच्या आंदोलनानंतर रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

Ahmednagarlive24 office
Published:
muslim

Ahmednagar News : अखंड हरिनाम सप्ताहाच्या प्रवचनात ईस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जीवन चरित्रावर चुकीचे व आक्षेपार्ह वक्तव्य करुन मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी सरला बेटचे महंत रामगिरी महाराज यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करुन त्यांना तात्काळ अटक करावी,

या मागणीसाठी जामखेड तालुक्यातील व शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. तीन तासाच्या आंदोलनानंतर रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

मंगळवारी दुपारच्या नमाज पठणनंतर शहरातील मुस्लिम समाज बांधव खर्डा चौकात दुपारी मोठ्या संख्येने जमले होते. ईस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जीवन चरित्रावर चुकीचे व आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ खर्डा चौक येथून मुस्लिम समाजाच्या मोर्चाला प्रारंभ झाला. घोषणा देत मोर्चा तहसील कार्यालयावर आला.

या वेळी युवकांनी जोरदार घोषणाबाजी करुन सदर घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. या वेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात, बहुजन वंचित आघाडीचे प्रवक्ते डॉ. अरुण जाधव, भिमसैनिक विकी सदाफुले, संभाजी बिग्रेडचे कुंडल राळेभात,

प्राचार्य विकी घायतडक, शिवसेना तालुकाध्यक्ष प्रा. कैलास माने व इतर राजकीय पक्ष संघटना सामील झाले होते. मुस्लीम समाजातील धर्मगुरू मुफ्ती अफजल कासमी, मुफ्ती मौलाना खलील अहमद व मुस्लीम समाज बहुसंख्येने उपस्थित होते.

तहसीलदार गणेश माळी व पोलीस उपाधीक्षक विवेकानंद वाखारे, यांनी आंदोलनस्थळी येऊन मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाचे निवेदन स्वीकारले. आंदोलकांनी यावेळी रामगिरी महाराजांवर जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी डीवायएसपी वाखारे यांच्याकडे केली.

तीन तासांच्या आंदोलनानंतर पोलिसांनी सोहेलअझरुद्दीन काझी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला. मोर्चाला पोलीस उपाधिक्षक विवेकानंद वाखारे व पोलीस निरीक्षक महेश पाटील, ऐओयांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe